कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव मध्ये बीज प्रक्रिया बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

✒️युवराज मेश्राम ✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर/कळमेश्वर:- कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव मध्ये कृषी महाविद्यालय उमरखेड व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सातव्या सत्रातील कृषिकन्या रश्मी राऊत यांनी बीज प्रक्रिया बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सुनील धोटे यांच्या शेतात जाऊन बीज प्रक्रियाचे महत्व व उत्पादन वाढीबाबत माहिती पटवून दिली.
प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी प्रत्येक बियाण्याची बीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. तसेच रायझोबियम व पी.एस.बी या घटकावर माहिती देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस .के. चिंताळे, प्रा. वाय.एस वाकोडे व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा .आर .के सपकाळ यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.