प्रशिक कला मंचा तर्फे सभासद नोंदणी अभियान महाराष्ट्र सूरू.

83

प्रशिक कला मंचा तर्फे सभासद नोंदणी अभियान महाराष्ट्र सूरू.

प्रशिक कला मंचा तर्फे सभासद नोंदणी अभियान महाराष्ट्र सूरू.
प्रशिक कला मंचा तर्फे सभासद नोंदणी अभियान महाराष्ट्र सूरू.

✒️प्रशांत जगताप ✒️
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
9766445348
महाराष्ट्र:- महाराष्ट्र हे फुले, शाहू आंबेडकर विचारधारेच राज्य म्हणुन संपुर्ण जगात महती आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीने तर स्वत्रंत भारत देशाला एक नवी दिक्षा देण्याचे कार्य केले. त्यात अनेक चळवळी आणि संस्था या गेल्या अनेक वर्षांपासून दिवस रात्र आपली सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक जबाबदारीचे निभवत आहे. त्यातील अशीच एक संस्था प्रशिक कला मंच ही पण आहे.

गेले सहा वर्षे लागातार प्रशिक कला मंच कलेच्या आणि प्रबोधनाच्या मार्गावर चालून समाजाचं निस्वार्थ प्रबोधन करत आहे. या निस्वार्थ समाजकार्याला समाजातील होतकरू मुलांनी मुलींनी आणि कला, क्रीडा, स्पीकर्स प्रेमींनी साथ द्यावी व समाजात प्रबोधनाचा वणवा पेटावा या साठी निरंतर काम करावे या हेतूने प्रशिक कला मंचाची महाराष्ट्र बांधणी सुरु करत आहे तरी कृपया इच्छुक सभासदांनी खालील प्रमाणे नोंदणी करावी.

गायक/गायिका: – ज्यांना आज पर्यंत कोणताही प्लॅटफॉर्म मिळाला नाही अश्या लोकांचा समूह वा ज्यांना आमच्या सोबत काम करायचे आहे यांचा समूह, किंवा व्यक्ती.

वादक:- सर्व वादक, ज्यांना आपली कला सादर करण्यासाठी मंच नाही असे वादक कलाकाराना येथे मंच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मेलडी प्लेअर:- म्युझिशियन्स कीबोर्ड प्लेअर, शेहणाई, बासरी प्लेअर, सीतार प्लेअर यांचा संच.

रिदमिस्ट -अरेंजर: – ते ज्यांच्या हातात कला आहे परंतु सादर करण्यासाठी किंवा आपलं हिडन टेलेंट जगाच्या समोर आणायचे आहे असे.

प्रशिक कला मंच कडे स्वतःचे काय आहे जे की वरील सभासदांना याचा फायदा घेता येईल:- स्वतःचा अत्याधुनिक रेकॉर्डिंग स्टुडियो सुसज्ज रेकॉर्डींग रूम स्वतंत्र मोनेटरिंग रूम सहित आणि सोबत अत्याधुनिक म्युसिक वाद्यांसोबत फुल्ली लोडेड ज्यांच्या कडे प्रोफेशनल वाद्य नाही पण कला आहे त्यांच्या साठी प्रोफेशनल वाद्यांचा संच आहे.

नट – नटी:- समाजात असंख्य कलाकार आहेत ज्यांना संधी भेटत नाही कॅमेरा फेस करायचा आहे प्रशिक कला मंच कडे तो प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही गृम होऊ शकता, आपली कॅमेरा समोरील वाटचाल करू शकता आणि स्वतःचा पोर्टफोलिओ अटोमॅटिकली जनरेट करू शकता, हौशी गौशी आणि नवशे नको सिरीयस क्लाकरांनाच संधी.

टेक्निशियन:- क्यामेरा, बुम, साउंड लाईट ऑपरेटर, साईट डिझायनर या सर्व गोष्टींची ओळख असलेले परंतु प्रत्यक्षात कामाची संधी न मिळालेल्या कलाकारांना सर्व गोष्टी हाताळायला व अनुभवायला मिळतील अट तो प्रशिक कला मंच चा सभासद हवा.

लेखक /कवी :- ते सर्व जे परिवर्तन वादी साहित्य समाजात पेरू इच्छितात ज्यांना समाजात लेखन रुपी क्रांती आणायची आहे परंतु मार्ग मिळत नाही मंच मिळत नाही अश्या लोकांसाठी हे दालन काम करेल.

प्रशिक कला मंच जवळ व्हिडियो साठी काय आहे:- अत्याधुनिक. फिल्ममेकिंग किट, बेसिक लेव्हल ते ऍडव्हान्स लेव्हल प्रो -लेव्हल किट अरेंजमेंट, फिल्ममेकींग एक्सपिरियन्स, अत्याधुनिक एडिटिंग मशीन, इक्युपमेंट्स वेल प्रोफेशनल एडिटर.

मस्पीकर्स – मोटिवेटर ककंटेंट क्रिएटर:- समाजात स्पीकर्स ची कमी नाही परंतु बोलणार कुठे विचार मांडणार कुठे प्रशिक कला मंच चा स्वतःचा स्पीकर रूम आहे जिथे तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वातावरणात आपले विचार मांडू शकतात लोकांपर्यंत पोहोचवू शकतात.

आंबेडकरोत्तर चळवळीतील सर्व हरहुन्नरी प्रशिक कला मंच च्या परिवारात सामिल होऊ पाहणाऱ्या लोकांनी अवश्य संपर्क करा आणि आपली सभासद निश्चिती करा खालील ग्रुप वर क्लिक करून आपण आपल्यामधील असलेल्या कला गुण कौशल्यानुसार आपली सभासद निश्चिती करू शकता.

सांस्कृतिक चळवळ उभी करण्यासाठी सांस्कृतिक मंच निर्माण होणे गरजेचे आहे तो मंच आपण तयार केला आहे, समाजाला कलाकाराच्या हाताची नाही तर मेंदूची गरज असते जो मेंदू कलाकार बदलवत असतो आपल्या अदाकारीने , एक उत्तम कार्यकर्ताच कलाकार बनू शकतो कारण समाजाचं चित्र आणि चरित्र नेत्या पेक्षा जास्त त्याला माहित असत चला तर मग एक या सांस्कृतिक मिशन मध्ये सहभागी होऊ आणि निर्भीड साहित्य आणि विचार समाजात पेरू.