बीड मधील धकादायक प्रकार: प्राध्यापकांनी सरपंचाला हाताशी धरून तब्बल 102 एकर इनामी जमीन बळकवल्याचा प्रकार

✒️श्याम भुतडा✒️
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005

बीड :- आष्टी मतदार संघाचे भाजपचे माजी आ.भीमसेन धोंडे, यांच्या महाविद्यालयातील चार प्राध्यापकांनी, सरपंचाला हाताशी धरून तब्बल 102 एकर इनामी जमीन बळकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन प्राध्यापकांसह चार जणांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या रुई नालकोल येथील, शेख महंमदबाबा यांची 102 एकर इनामी जमीन, खोटे दस्तावेज तयार करून बळकावल्या प्रकरणी, चार व्यक्ती व खोटी साक्ष दिलेले दोन जण अश्या सहा व्यक्तींवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी 2 वरिष्ठ प्राध्यापक, 1 विद्यमान सरपंच व अन्य 1 अशा 4 व्यक्तींना, मध्यरात्री 1 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्याध्यापक व एक प्राध्यापक पोलिसांना चकमा देत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याऐवजी, चक्क इनामी जमिनी प्राध्यापक बळकायला लागल्याने, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या खोट्या दस्त ऐवजावर साक्षीदार म्हणून संजय भाऊसाहेब नालकोल, सरपंच-रुई नालकोल ता.आष्टी व शरद नानाभाऊ पवार, रा.रुई नालकोल ता.आष्टी, यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या. तर, अजिनाथ बोडखे, गोपीनाथ बोडखे, मुस्ताक शेख हे कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

बीड जिल्ह्यात जवळपास 27 हजार एक्कर इनामी जमीन आहे. मात्र मस्जिद, दर्गा, मंदिर व इतर देवस्थानच्या इनामी जमिनीचे बनावट दस्त ऐवज तयार करून, खरेदी विक्री सुरू आहे. यामुळं जिल्ह्यातील इनामी जमिनी लुटणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here