स्थानिक कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्या: भाजयुमो जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांची मागणी
रो.ह.यो विधीमंडळ समिती प्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांची भेट घेत सादर केले निवेदन

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे बरोजगरणा रोजगार स्थानिक कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजयुमो चंद्रपूर महानगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी रो.ह.यो विधीमंडळ समिती प्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांची भेट घेत निवेदन सादर करुन केली आहे.
सदर निवेदनातून महेश कोलावार यांनी म्हणाले की,दिवसेंदिवस देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.त्याचप्रमाणे बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढत आहे.सध्याच्या परिस्थितीत बेरोजगार ही सगळ्यात मोठी समस्या आहे.जिल्ह्यात अनेक कंपन्या आहेत,पण त्या कंपन्यांमध्ये स्थानिक कमी व इतर जास्त प्रमाणात नोकरीवर आहेत.तर ही बाब अतिशय अन्यायकारक आहे.
ज्या स्थानिक लोकांच्या मदतीने व प्रशासनाच्या मदतीने अनेक कंपन्या उघडले आहेत,त्याच स्थानिक बेरोजगारांना पाहिजे तेवढा रोजगार मिळत नाही.तर शासनांनी व विधीमंडळांनी याकडे विशेष लक्ष देऊन किमान ४०% रोजगार हे स्थानिकांना व ६०% रोजगार इतरांना देण्याची तरतूद कंपन्यांना मान्यता देतांना करावी.आणि तसेच याबाबतीचा ठरावही पास करावा,अशी मागणी महेश कोलावार यांनी केली.