मंगरुळपिर शहरातील चौकांचे नामांतर प्रकरण, सभागृहात मुख्याधिकारी यांचेशी चर्चाअंती नामांतर द्यावे: अनिल गावंडे

✒विनायक सुर्वे, वाशिम✒
मो.9011122836
मंगरुळपिर ता 4:- शहरातील सद्यस्थितीत असलेल्या व्हिडीओ चौकाचे नाव बदलून जय महाराष्ट्र चौक व सदर ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यासाठी येत्या 7 सप्टेंबर ला ठराव मांडण्यात येणार आहे. परंतु हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात हरकत नाही परंतु या विषयावर मुख्य अधिकारी यांचे मत घेणे जरुरी असून या विषयावर मुख्याधिकारी यांच्या समोर नगर पालिका सभागृहांमध्ये चर्चा करावे असे नगरसेवक अनिल गावंडे व ईतर नगरसेवकांनी नगराध्यक्षा डॉ गजाला खान यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात नमूद आहे की सभागृहा मधील माझे असलेले ज्येष्ठ नगरसेवक व विरोधी पक्ष नेते यांनीसुद्धा या बाबींकडे गंभीरतेने लक्ष देऊन नगर पालिका मुख्याधिकारी सोबत चर्चा करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक नगरपरिषदेच्या वाचनालयातील कंपाऊंड वॉल मध्ये उभारण्यात यावे ज्याने करून त्यांच्या स्मारकाला संरक्षण होऊन शहराची शोभा वाढेल असेही निवेदनात म्हटले आहे.

तसेच सभागृहाच्या सर्व नगरसेवकांना नम्र विनंती आहे .तसेच नगरपरिषद सभागृहाला बाळासाहेब ठाकरे सभागृह नाव देण्यात यावे , नगराध्यक्षा यांच्या प्रयत्नाने सध्या शहरातील रस्ते झाल्यामुळे आपल्या शहराची शोभा वाढली आहे परंतु या मुख्य मार्गाला महापुरुषांचे,व आराध्य दैवतांची नावे देऊन शहराची शोभा वाढवावी यामध्य छत्रपती शिवाजी चौक, संत बिरबलनाथ महाराज प्रवेश द्वार, दादा ह्यात कलंदर प्रवेश द्वार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार व वीर भगतसिंग प्रवेशद्वार असे नामांतर केल्याने शहराच्या वैभवात भर पडेल असेही नगरसेवक अनिल गावंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नगरसेवक विरेंद्रसिह ठाकूर, अनिल गावंडे, पुरुषोत्तम चितलांगे, उषाताई हिवरकर, सचिन पवार, ज्योतिताई लवटे, आकाश संगत या नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here