धक्कादायक बातमी, मजुराच्या मारहाणीत ठेकेदाराचा मृत्यू

धक्कादायक बातमी, मजुराच्या मारहाणीत ठेकेदाराचा मृत्यू

धक्कादायक बातमी, मजुराच्या मारहाणीत ठेकेदाराचा मृत्यू

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : मजुराने बांधकाम ठेकेदाराला मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना 3 सप्टेंबर ला घडली. समीर रत्नाकर भोयर असे मृताचे नाव आहे. मृतक समीर रत्नाकर भोयर हा बांधकाम ठेकेदार होता. समीर हा 2 सप्टेंबरला वाहनचालक संदेश कवाडेसोबत बाहेर गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी वाहनचालक संदेशने समीरच्या पत्नीला तुमचा पती दारु पिऊन पडला आहे, असे फोनवर सांगितले. समिरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मृत्यू झाला होता. चंद्रपूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला. मात्र, शंका आल्याने पोलिसांनी चौकशी सुरु केली. 3 सप्टेंबरला सकाळी समीर हा श्री टॉकीज चौकातील मजुरांच्या ठिय्यावर पोहचला असता, एक मजूर गजानन अल्लारवार हा झोपून होता.समीर ने त्याला झोपेतून उठविण्यासाठी त्याच्या गालावर 2 थापड मारल्या. गालावर थापड का मारली म्हणून गजाननने समीरला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत समीरच्या गुप्तांगाला जबर मार बसल्याने समीर चा मृत्यू झाला. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पुलिस उपनिरीक्षक बाबा डोमकावळे यांनी प्राथमिक अहवालानुसार आरोपी गजाननवर हत्येचा गुन्हा दाखल करीत अटक केली. पुढील तपास सहाय्यक पुलिस निरीक्षक अतुल थुल करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here