अध्यात्मिक व सामाजिक चळवळ पुढे नेणारे निर्मला देवी सहज योग ध्यान मंदिर सोयी सुविधायुक्त होणार...

अध्यात्मिक व सामाजिक चळवळ पुढे नेणारे निर्मला देवी सहज योग ध्यान मंदिर सोयी सुविधायुक्त होणार…

अध्यात्मिक व सामाजिक चळवळ पुढे नेणारे निर्मला देवी सहज योग ध्यान मंदिर सोयी सुविधायुक्त होणार...

✍तारा आत्राम✍
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
95116 20282

चंद्रपूर : – निर्मला देवी यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी घरे बांधली, अनेक आंतरराष्ट्रीय शाळा, आरोग्य, संशोधन केंद्र, शास्त्रीय संगीत आणि ललित कला यांना प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय अकादमी यासह अशासकीय संस्था स्थापन केल्या. त्यांचा वसा आता ध्यान केंद्रांद्वारे पूढे नेल्या जात आहे. मोरवा येथील ध्यान मंदिरही याचेच एक प्रतिक असुन अध्यात्मिक आणि सामाजिक चळवळ पुढे नेणारे हे निर्मला देवी सहज योग ध्यान मंदिर सोयी सुविधायुक्त करणार, येथे आमदार निधीतुन ५० लक्ष रुपये खर्च करत ध्यान मंदिराकडे जाणा-या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. आज या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. आज हा मार्ग तयार झाला आहे. या मार्गाचे लोकार्पण होत असतांना समाधान वाटत आहे. मात्र येथे पुढेही विकास कामे सुरुच राहतील. येथील भोजनकक्ष अत्याधुनिक करण्याची गरज आहे. यासाठी आपण २५ लक्ष रुपये देऊन या भक्ती कार्याला माझे हातभार लागणार आहे. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे श्री.अजय जयसवाल, माजी नगर सेवक बलराम श्री.डोडाणी, सरपंच्या सौ. स्नेहा साव, उपसरपंच श्री. भुषण सह इतरही मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here