लहान भावाने मोठ्या भावाचा व वहिनीचा केला खून!जागेच्या वादातून घडले हत्याकांड आरोपीला अटक गायडोंगरी येथील घटना

लहान भावाने मोठ्या भावाचा व वहिनीचा केला खून!जागेच्या वादातून घडले हत्याकांड
आरोपीला अटक
गायडोंगरी येथील घटना

लहान भावाने मोठ्या भावाचा व वहिनीचा केला खून!जागेच्या वादातून घडले हत्याकांड आरोपीला अटक गायडोंगरी येथील घटना

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

सावली, 5 सप्टेंबर
मोठ्या भावासोबत जागे संदर्भात असलेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील गायडोंगरी येथे सोमवार, 5 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. धनराज निंबाजी गुरुनुले (52) असे आरोपी असलेल्या लहान भावाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गायडोंगरी येथील मनोहर निंबाजी गुरुनुले (62) व शारदा मनोहर गुरुनुले (50) यांचे जागेच्या वादातून लहान भाऊ धनराज निंबाजी गुरुनुले याच्यासोबत नेहमीच खटके उडायचे. दरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास दोन्ही भावामध्ये जोरदार भांडण झाला. त्यात धनराज गुरुनुले यांनी आपल्या मोठा भाऊ मनोहर व वहिनी शारदा यांना सब्बलने मारहाण केली. यात मनोहर गुरुनुले हा जागीच ठार झाला. तर शारदा गुरुनुले गंभीर जखमी झाली. तिला हिला प्रथम सावली व नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहीती पाथरी पोलिसांना कळताच ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेतले. आरोपी विरोधात कलम 302, 307 अन्यवे गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी इंगळे यांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास पाथरीचे ठाणेदार मोहड यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण येगेवार, अशोक मोहूर्ले, वसंत नागरीकर, सुरज शेडमाके, प्यारेलाल देव्हारे, जनार्धन मांदाळे, राजू केवट आदी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here