प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरंगे पाटील यांची भेट…

मीडियावार्ता
जालना प्रतिनिधी: 
गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळाले पाहिजे, याची प्रकाश आंबेडकरांना जाणीव आहे. मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे, ती भूमिका आम्हाला पहिल्या पासूनच योग्य वाटते, असे मनोज जरंगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर सांगितले.

नेता असावा तर प्रकाश आंबेडकरांसारखा मोठ्या मनाचा असावा. दुसऱ्याला आरक्षण मिळू द्यायचे नाही, असा प्रकाश आंबेडकरांचा उद्देश कधी नव्हता. घटनेनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर साहेब आधीपासूनच सांगत होते. पण इतर राजकारणी, नेते एकूण बहिरे होते. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचे आम्ही मराठा समाज स्वागतच करतो, असे मनोज जरंगे पाटील यांनी या भेटीबद्दल प्रसार माध्यमांना सांगितले.

मरण्यापेक्षा मारा, आणि आपलं राज्य करा, कारण आपण या देशाचे मालक आहोत. लोकशाहीत जनता मालक असते, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरंगे पाटील यांना केले.

दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणा संदर्भात कायदेशीर मुद्दे स्पष्ट करताना सांगितले कि, आर्थिक मागास असलेली संकल्पना हि महाराष्ट्राची आहे आणि ती आताच्या केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे. कोर्टाने तिला मान्यता दिली आहे. हाच आधार घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे घेऊन जावा लागणार आहे.

याचवेळी त्यांनी मनोज जरंगे पाटील यांना आवाहन केले कि, आरक्षणाचा लढा लढताना त्यांनी मरणाची भाषा करू नये. लढणारी माणसे जर निघून गेली तर लढणार कोण? मरण्यापेक्षा मारा, आणि आपलं राज्य करा, कारण आपण या देशाचे मालक आहोत. लोकशाहीत जनता मालक असते, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरंगे पाटील यांना केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here