राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी काळूस्ते येथील आदिवासी वादळचे संस्थापक सोमनाथ घारे यांची निवड

मीडियावार्ता 

इगतपुरी प्रतिनिधी:

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या इगतपुरी तालुका कार्याध्यक्षपदी शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले नरेश उर्फ सोमनाथ घारे यांची सार्थ निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम हिरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, नाशिक शहरप्रमुख गजानन नाना शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश खातळे आदींनी त्यांना निवडीचे पत्र दिले. पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष नरेश घारे यांनी सांगितले.

शरद पवार यांचे कट्टर समर्थक आदिवासी वादळ इगतपुरी तालुकाप्रमुख हिंदू महादेव कोळी संघटना इगतपुरी तालुका आदिवासी वादळ तालीम संघ काळुस्ते संस्थापक असलेले नरेश घारे यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या सार्थ निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत सागर टोचे, वॆभव धांडे, विध्यर्थी ता.आध्यक्ष तेजस भोर, प्रदेश युवक सरचिटणीस दिनेश धाञक ,युवक कार्यध्यक्ष गणेश गायधनी, गोरख ढोकणे, राजु गतीर, दिपक नागरे, काशिनाथ कोरडे, सागर टोचे , संदिप धांडे , विध्यार्थी ता.आध्यक्ष- तेजस भोर ,धनंजय भोर ,विजय तांबे, नामदेव शिंदे ,योगेश गोवर्धने , धनाजी जाधव, बाळा बोंडे, नवनाथ गायकर , विजय जाधव, उमेश बर्हे, बस्तिराम खातळे ,वॆभव पाटील, विकी कोरडे, आकाश बागूल, माधव पारधी, उमेश जगदाळे, लक्ष्मण बिडवे यांनी केले.

शेतकऱ्यांचा बुलुंद आवाज शरद पवार यांच्या चळवळीत काम करताना अनेक संघर्ष पाहायला मिळाला. कुणाच्या जाण्याने आमच्यावर कवडीमात्र फरक पडत नाही. वंचित, शेतकरी, कष्टकरी शेतकऱ्यांच्या हृदयात आजही शरद पवार आहेत. राज्य पातळीवर एकत्र काम करणारे निर्मान झाले आहेत. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे- उमेश खातळे, माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here