विद्यार्थी सुरक्षा विषयक कार्यशाळा दोन सत्रांत संपन्न .

म्हसळा शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा प्रार्थमिकशिक्षणाधिकारी श्रीमती पुनिता गुरव मॅडम यांच्या उपस्थितींत

विद्यार्थी सुरक्षा विषयक कार्यशाळा दोन सत्रांत संपन्न .

विद्यार्थी सुरक्षा विषयक कार्यशाळा दोन सत्रांत संपन्न .

✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:रायगडच्या प्राथमिक विभागाच्या
शिक्षणाधिकारी श्रीमती
पुनिता गुरव मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा व उपाय योजना याबाबत सोमवार
दिनांक २ सप्टेंबर रोजी शिक्षण विभाग पंचायत समिती म्हसळा चे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या पुढाकाराने म्हसळा न्यू इंग्लिश स्कुल आणि जुनिअर् कॉलेज म्हसळा येथे तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांची विद्यार्थी सुरक्षा या विषयावर कार्यशाळा व चर्चासत्र दोन सत्रांत घेण्यात आले, .चर्चासत्रात स्वतः शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी उपस्थित राहून केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याशी संवाद साधून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत करावयाच्या विविध उपाय योजनांची व प्रतिबंधात्मक कार्याची माहिती देतानाच सीसीटीव्ही, तक्रार निवारण पेटी ,सखी सावित्री समिती या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेला म्हसळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी शैक्षणिक गुणवत्ते सोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्रमुख जबाबदारी आहे याची जाणीव करून देतानाच या संदर्भातील शासनाचे विविध जीआर , निर्णय, कायदे यासंबंधी सर्वांना माहीती दिली ,या कार्य शाळेतील पहिल्या सत्रामध्ये मुलींचे आरोग्य व समस्या, मुलगी वयात येतानाचे विविध टप्पे यावर शालेय शिक्षक ,कर्मचारी, केंद्रप्रमुख, पालक यांची भूमिका व जबाबदारी याबाबत आरोग्य विभाग मेंदडी च्या डॉक्टर पूजा डोंगरे यांनी शास्त्रीय दृष्ट्या सविस्तर मार्गदर्शन केले ,डायटचे प्रतिनिधी विसेसर यांनी दिव्यांग विद्यार्थी कायदे व त्याना देता येणाऱ्या सवलतीच्या .च्या योजना विद्यार्थी शैक्षणिक विकास व गुणवत्ता यामध्ये शिक्षकांची भूमिका पारदर्शक आणि महत्वाची असावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी नुकतीच कायद्याची पदवी प्राप्त केलेले असे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पीएनपीची माध्यमिक शाळा पाष्टी चे विज्ञान शिक्षक विनयकुमार सोनवणे यांनी पोक्सो कायदा, भारतीय दंड संहिता, बाल न्याय कायदा , असे बालकाच्या सुरक्षेशी संबंधित विविध कायद्याची सविस्तर माहिती दिली.साधनव्यक्ती दीपक पाटील यांनी नवभारत साक्षरता अभियान कार्यवाही बाबत सविस्तर मार्गदर्शक केले.जिल्हा उप-शिक्षणाधिकारी( प्राथमिक) संतोष शेडगे यांनी आव्हानांना नेव्हिगेट करण्यासाठी आणि विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या क्षमता वाढवण्यासाठी अर्थपूर्ण मार्गदर्शन केले कार्यशाळेला तालुक्यातील विस्तार अधिकारी मोरे, सर्व केंद्रप्रमुख , साधन व्यक्ती तालुक्यातील सर्व माध्यमाचे शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here