लोटस पब्लिक स्कूल, भंडारा येथे ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

लोटस पब्लिक स्कूल, भंडारा येथे ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

लोटस पब्लिक स्कूल, भंडारा येथे ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो. 8208166961

भंडारा :- लोटस पब्लिक स्कूल, वैशाली नगर, भंडारा येथे ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर उपक्रमशील शाळा नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अनुभावातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असते. म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त आयोजित शिक्षक दिन प्रसंगी विद्यार्थ्याना शिक्षक बणण्याची संधी देवून शिकवण्याचा अनुभव देण्यात आला. अनुभवातून शिक्षण या उपक्रमात लहान चिमुकल्यानी शिक्षकांची वेशभूषा परिधान करून शिकवण्याचा आनंद घेतला. यात एलकेजी च्या दिशांशी दिनेश आगाशे (हिन्दी), उमंग आशिष पचारे (मॅथ्स), अदविका खोब्रागडे (इंग्लिश), भाविन सार्वे (GA), यशस्वी खोब्रागडे (मॅथ्स), रिधान धुळसे (GA) या विद्यार्थ्यानी तर यूकेजी मधून मेघना मिराशे (इंग्लिश) व अनुज उरकुडे (मॅथ्स) या विद्यार्थ्यानी शिक्षक म्हणून सहभाग घेतला. यामध्ये अनुज उरकुडे याने प्रथम, दिशांशी आगाशे द्वितीय तर उमंग पचारे तृतीय असे क्रमांक प्राप्त केले.
तत्पूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सौ. अश्विनी भैसारे यांनी श्री राधाकृष्णन यांचे जीवन व शिक्षक दिन यावर प्रकाश टाकला. अश्विनी भैसारे यांच्या सफल मार्गदर्शनात संगीता पुरी मिस, छाया संग्रामे मिस, रुचिता आगरे मिस, नंदिनी मिस, रेखा दीदी, यांनी हा उत्सव यशस्वी करण्यात अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here