ईद मिलादुन्नबी: एकतेचा आणि शांततेचा संदेश देणारा सण साजरा
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ येथे भर पावसात मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्त्वाचा सण ईद मिलादुन्नबी शहरात आज अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
हा दिवस इस्लाम धर्माचे संस्थापक, हजरत मुहंमद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. पैगंबरांचे जीवनकार्य आणि त्यांच्या शिकवणींना उजाळा देत, विविध ठिकाणी शांती, एकता आणि मानवतेचा संदेश दिला गेला.
नेरळ शहरातील प्रमुख मशिदी आणि मदरशांमध्ये विशेष नमाज आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी, काही ठिकाणी सर्वधर्मीय सभाही घेण्यात आल्या.
मोहसीन मार्केट मधील दुकानदार यांनी सजावट व सरबत वाटप करण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन ‘ईद मिलादुन्नबी’च्या निमित्ताने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. हजरत मुहंमद पैगंबर यांनी दिलेला प्रेम, करुणा आणि माणुसकीचा संदेश आजच्या काळात अधिकच महत्त्वाचा ठरत आहे. सामाजिक तेढ वाढत असताना, अशा सणांच्या निमित्ताने समाजाला समजूतदारपणा, सहिष्णुता आणि बंधुतेचा मार्ग अनुसरण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. नेरळ पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात नेरळ बाजारपेठ येथे ऱ्याली काढण्यात आली.