पोलादपूरमध्ये मोफत रुग्णवाहिका व दवाखान्याचे लोकार्पण विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न

25

पोलादपूरमध्ये मोफत रुग्णवाहिका व दवाखान्याचे लोकार्पण विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न

सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यासाठी मोफत रुग्णवाहिका व मोफत दवाखान्याचा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. हा कार्यक्रम शिवसेना उपनेते व जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे आणि युवासेना कोअर कमिटीचे सदस्य श्री. विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाला.

या लोकार्पण सोहळ्यास शिवसेना संपर्क प्रमुख व माजी उपाध्यक्ष श्री. चंद्रकांतजी कळंबे, पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा दरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना तालुका प्रमुख श्री. निलेश आहिरे, युवासेना समन्वयक श्री. इम्रान भाई पठाण, नायक मराठा समाज पोलादपूर अध्यक्ष श्री. सुनील मोरे, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. सुवर्णा कदम, विभाग प्रमुख श्री. लक्ष्मण मोरे, श्री. तानाजी निकम, माजी नगराध्यक्षा सौ. सोनाली गायकवाड, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. अस्मिता पवार यांचा समावेश होता.

नगरसेवक श्री. सिद्धेश शेठ, श्री. विनायक दीक्षित, श्री. निखिल काफडेकर, नगरसेविका सौ. स्नेहा मेहता, युवासेना शहर प्रमुख कु. प्रसाद मोरे, युवासेना संपर्क प्रमुख श्री. निलेश किंक, प्रसाद साने, आणि युवासेना उपविभाग प्रमुख मंगेश पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

या उपक्रमामुळे पोलादपूर परिसरातील नागरिकांना तात्काळ व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक बळकट होणार आहेत. जिजाऊ संस्था व शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.