शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान

26

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान

चोंढी-किहीम येथील स.म. वडकेहा विद्यालयातर्फे शिक्षक दिन साजरा

प्रशांत नार्वेकर
अलिबाग प्रतिनिधी
91589 96666

अलिबाग:- डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी (दि.5) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. चोंढी – किहीम येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या स.म.वडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रविंद्र उर्फ काका ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मराठी माध्यम शिक्षिका संजीवनी भोईर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक रविंद्र वाघमारे, शिक्षिका सुलभा पेढवी, प्री प्रायमरी ते माध्यमिक इंग्रजी माध्यम विभागाच्या शिक्षिका प्रतीक्षा पाटील, सिनियर कॉलेजच्या प्राध्यापिका हर्षदा कवळे, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मराठी व इंग्रजी माध्यमच्या सेविका शुभांगी भोईर, माध्यमिक, शिपाई सुनिल थळे, कनिष्ठ लिपीक शंकर नाईक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे खजिनदार राजेंद्र शिंदे, ज्येष्ठ संचालक सुनिल थळे, जगन्नाथ महाले, किरण ठाकूर, मनोहर म्हात्रे, उपमुख्याध्यापिका नम्रता म्हात्रे,पर्यवेक्षिका स्वागता पाटील, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक संदीप पाटील, माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिकाघरत व इंग्रजी माध्यम प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका पावशे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश म्हात्रे, जुईली पेढवी यांनी केले असून प्रास्ताविक मुख्याध्यापिक सुवेगा पाटील व शैलेश तिर्लोटकर यांनी आभार व्यक्त केले.