उत्तर प्रदेश योगी सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा…..

56

उत्तर प्रदेश योगी सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा…..

ईशान्य मुंबई काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी घाटकोपर अमृतनगर येथे योगी सरकारच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन.

(हिरामण गोरेगांवकर )
मुंबई घाटकोपर दि. 04/10/2020 :- दिवसेंदिवस माणूस राक्षसी प्रवृत्तीकडे झुकला जात असताना उत्तरप्रदेश तसेच बिहार सारख्या राज्यात या गोष्टीमुळे अक्षरशः अराजकता माजत आहे त्यातच हाथरस येथील सामूहिक बलात्काराने या राक्षसी वृत्तीने कळसच गाठला आहे. भारत देश स्वतंत्र होऊन आज सुद्धा जातीभेद चालूच आहेत सगळीकडे हलक्या जातीचा म्हटला कि लचके तोडायला तयारच असतात मग प्रश्न असा उपस्थित होतो की याच जातीभेदासाठी किंबहुना अस्पृश्यतेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं योगदान व्यर्थ नाही म्हणतां येणार पण आज हि या समाजाला बाबासाहेबांची गरज आहे याची जाणीव होत आहे. बाबासाहेबानी देशाला दिलेली राज्यघटना, कायदे यांचं जर काटेकोर पालन केलं तर अशा घटना होऊ शकत नाही या राक्षसी लोकांना तेच संविधान, आणि कायदे स्वतःच्या स्वार्थासाठी बदलून देशातील वातावरण दूषित करायचे आहे. त्यामुळे असे सामूहिक बलात्काराला खतपाणी मिळत आहे. आणि हीच परिस्थिती सध्या उत्तरप्रदेश येथील हाथरस येथे घडली आहे. तेथील सरकार आणि प्रशासन हे दोषींना पाठीशी घालून काय लपवू पाहतय यात काहीतरी षडयंत्र किंवा राजसकीय हेतू नक्कीच असावा. असे सर्वत्र चर्चा सुरु आहे आणि तेथील सरकार तसेच प्रशासन यांच्या विरोधात देशभरातुन तीव्र संताप तसेच निषेध नोंदवला जात आहे. आणि अशाच प्रकारे ईशान्य मुंबई काँग्रेस कमिटी तर्फे रविवारी योगी सरकार बरखास्त करा या घोषणेसह निषेध मोर्चाचे आयोजन केलं गेलं त्यास असंख्य लोकांनी अस्पुर्थ पाठिंबा देऊन निषेध नोंदवला.