यवतमाळ जिल्हात ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय लक्षणीय उपोषण.

यवतमाळ जिल्हात ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय लक्षणीय उपोषण.

ग्राम रोजगार सेवकांना कायम सेवेत घ्यावे – डॉ विष्णू उकंडे

यवतमाळ जिल्हात ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय लक्षणीय उपोषण.
यवतमाळ जिल्हात ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय लक्षणीय उपोषण.

✍🏻राम राठोड 
9422160416
दिग्रस तालुका प्रतिनिधी

दिग्रस : ग्राम रोजगार सेवक संघर्ष समितीच्या वतीने २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी तहसील आवारात एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात, शासकीय सेवेत ग्राम रोजगार सेवकांना समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, ग्रामरोजगार सेवकांची संख्या २८ हजार १४४ एवढी असून राज्य सरकारने महत्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामसभेतून ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्यामध्ये सन २००६ पासून आजतागायत राज्यात एकूण २८ हजार १४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून ६% मानधनावर कार्यरत असून सन २००६ पासून गेल्या १५ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतात. पण प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनलच्या माध्यमातून नविन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते. पण राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाल्यावर सुडबुध्दीने ग्रामरोजगार सेवकावर खोट्या प्रोसेडिंग द्वारे कामावरून कमी करून जाणिवपूर्वक अन्याय केला जातो. त्यामुळे हि बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना मानसिक त्रास होऊन कोणत्याही निर्णयाला सामोरे जावे लागते व त्यांच्या कुटुंबाची पालनपोषणाची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार सेवकावर असल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व त्यांच्यावर अन्याय होतो, हे सत्य आहे. राज्यातील एकूण २८ हजार १४४ ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक यांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय द्यावा अशी मागणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणदरम्यान केली. यावेळी यवतमाळ पर्यावरण समिती सदस्य डॉ.विष्णू उकंडे यांनी उपोषण मंडपाला भेट रोजगार सेवकांना कायम सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या उपोषनात ताराचंद राठोड, रामराव मनवर, विजय वाघमारे, कैलास राऊत, शरद चव्हाण, अंबादास भवाळ, निखिल जाधव, दिलीप ढगे, दीपक उरेकर, प्रकाश चव्हाण, गणेश राठोड, अनेक चव्हाण, गणेश मनवर, देवानंद पाईकराव, सुनील आडे, अनुप मिश्रा, प्रेमानंद पवार, गोवर्धन पवार, बबन जाधव, लोभा जाधव, वसंत राठोड, सुनील शेंबडे, राजू राठोड, शंकर जुडे, योगेंद्र भगत, युवराज राठोड, प्रवीण साळवे, संदीप मानतुटे, शंकर विरंगणे आदी उपस्थित होते.