यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची माकप व किसान सभेची मागणी
यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची माकप व किसान सभेची मागणी

यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची माकप व किसान सभेची मागणी.

उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन

यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची माकप व किसान सभेची मागणी
यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची माकप व किसान सभेची मागणी

नितेश पत्रकार (NT)
वणी तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
मो नंबर ।7620029220

वणी : दि, 04:- या वर्षी अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱयांचे पुरते कंबरडे मोडले असून कापूस, सोयाबीन, तूर व भाजीपाला ह्या पीकाची नासाडी झाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नसल्याने शेतकऱ्यांचा अंत न बघता ताबडतोब यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना पन्नास हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा वतीने मा. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.

शासनाने या वर्षी पिकाची परिस्थिती वाईट असताना पिकाची आणेवारी ६० टक्क्यांच्या वर दाखवून शेतकऱ्यांना हादरवून टाकले आहे, व त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या अंत न बघता त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी, सर्वच शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नसल्याने व सर्वच शेतकऱ्यांना ह्या बाबी समजत नसल्याने शेतकऱ्यांकडून करण्यात येणारा इ पीक पेरा नोंदविणे रद्द करावे आणि यंत्रणेमार्फत पीक पेरा नोंदवावे, पीक विमा काढूनही पीक विमा मिळत नसल्यामुळे ती देण्याची यंत्रणा ताबडतोब राबवावी, किसान सन्मान निधी योजनेत अनेक शेतकऱ्यांची नावे आली नसल्याने शेतकऱ्यांची नावे नोंदवून त्यांना किसान सन्मान निधी देण्यात यावा, अडकवून ठेवलेले पांदण रस्ते मोकळे करून असलेल्या तक्रारी सोडविण्यात याव्या, कापूस व सोयाबीनची आधारभूत किमतीने विकत घेण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांचे निवेदन माकप व किसान सभेच्या वतीने कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. दिलीप परचाके, कॉ. सुरेश शेंडे, कॉ.मनोज काळे, सुदर्शन पंधरे, गुलाब परचाके, सचिन डांगे आदींच्या सह्यांचे देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here