अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार संतोष ताटीकोंडावार यांचा पत्रकार परिषदेतून इशारा.

अमोल रामटेके
अहेरी तालुका प्रतिनिधी 9405855335
गडचिरोली:- गडचिरोली जिल्हातील आलापल्ली-सिरोंचा या रस्त्याच्या समस्येला घेऊन प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी, शासन स्तरासह लोक प्रतिनधींनाही अनेकदा निवेदन, तक्रारी सादर केल्या. मात्र याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तत्काळ एक समिती गठित करुन या राष्ट्रीय महामार्गाची बांधकामाची चौकशी करावी, अन्यथा संबंधित कंत्राटदारासह अधिका-यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडवार यांनी आज, 4 ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिला.
पत्रकार परिषदेत माहिती देताना ताटीकोंडावार यांनी म्हटले की, आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग मागील 2 वर्षापासून अक्षरश: दयनीय अवस्थेत आहेत. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अवजड वाहनांसह चारचाकी चालकांना महामार्गावरुन वाहन चालविणे खडतर बनले आहे. त्यामुळे आलापल्ली-सिरोंचा मार्ग 353 रस्त्याची चौकशी करुन संबंधित अधिका-यांवर चौकशी करण्याबाबत जिल्हाधिका-यांना 2 वेळा लेखी तक्रार केली. या तक्रारीची प्रत पालकमंत्री तसेच मंत्री विजय वडेट्टीवार यांना सादर केली. मात्र अद्यापही या महामार्गाच्या निष्कृष्ठेची अधिकारी तसेच लोकनेत्यांनी दखल घेतली नाही. खड्डेमय रस्त्यामुळे नागपूरवरुन येणा-या सर्व बसेस सद्यस्थितीत बंद पडली आहेत. परिणामी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना खासगी वाहनाने अधिकचा भूर्दंड सोसित मार्गक्रमण करावे लागत आहेत. तर अनेक नागरीक तेलंगणा राज्यातून चंद्रपूर मार्गे जिल्हास्थळ गाठत आहेत. यात त्यांना आर्थिक तसेच मानसीक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हास्थळ गाठण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतांना या राष्ट्रीय महामार्गाच्या तक्रारींची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठाप्रंती तसेच लोकप्रतिनिधींप्रती रोष व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करुनही संबंधितांवर आजपर्यंत कुठलीच कारवाई न झाल्याने सर्वप्रथम संबंधित अधिका-यांना नोटीस देऊन बांधकामाची चौकशीकरीता समिती गठित करण्याची मागणी केली जाणार आहे. त्यानंतरही चौकशी न झाल्यास उच्च न्यायालयात संबंधित अधिका-यांवर कंत्राटदार विरोधात याचिका दाखल करणार असल्याची माहिती संतोष ताटीकोंडावार यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हा संघटक अरुण शेडमाके यांची उपस्थिती होती.