चेक बोरगावचे सरपंच सुदर्शन कोवे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर.
ई पीक पाहणी ची नोंदणी करत, शेती संबंधी विषयावर मार्गदर्शन.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- ई पीक ही महत्वाकांक्षी योजना राज्य सरकार कडून राबविली जात आहे. शेत पीक ७/१२ वर पूर्ण पणे कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न आहे. बहुसंख्य शेतकरी अशिक्षित असल्याने आणि अँड्रॉइड फोन वापरता येत नसल्याने त्याच प्रकारे ग्रामीण भागात नेटवर्क ची समस्या प्रामुख्याने असल्याने शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांना ई पीक नोंदणी करणे कठीणच.त्यामुळे गावातील सुज्ञ आणि प्रतिष्ठित व्यक्ती स्वतः पुढाकार घेऊन नोंदणी करतांना दिसून येत आहे.
अश्याच प्रकारे तालुक्यातील चेक बोरगाव (टेंभूरवाई) चे सरपंच सुदर्शन कोवे यांनी गावचा प्रमुख हे नाते जोपासत प्रत्येक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोबाईल ॲप द्वारे ई पीक पहणीची नोंदणी केली. ई पीक नोंदणी विषयी माहिती देत शेती संबंधी इतर विषयावर मार्गदर्शन करताना दिसून आले.