कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सोमवार, 4 ऑक्टोबरला सुरू करण्यात आल्या आहेत.
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा:- देशात आणि राज्यात सर्वत्र कोरोना वायरसच्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे माघील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सोमवार, 4 ऑक्टोबरला सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार, शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. ग्रामीण भागातील वर्ग 8 ते 12 या शाळा यापूर्वी सुरू केल्या होत्या.
शाळा बंद असल्यामुळे विध्यार्थीचे मोठ्या प्रमाणात नुसकान होत होते. ग्रामीण भागात तर चित्र खुप वेगळ होते. ऑनलाइन वर्ग घेण्यात येत असले तरी ते विध्यर्थाचा समजण्या पलीकडे होते. त्यामूळे शासनावर शाळा सुरु करण्या साठी मोठा दबाव येत होता.
सोमवारपासून वर्ग 5 ते 7 ची शाळा सुरू करण्यात आली. शहरी विभागातील शाळेचा पहिला दिवस असल्याने वर्ग 8 ते 12 चे बरेच विद्यार्थी शाळेत यावेळी उपस्थित होते. शासनाच्या सूचनेनुसार, सर्व शाळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सुरू झाल्या. दीर्घ विश्रांतीनंतर शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षक पाहायला मिळाले.