प्रवाशांनो सावधान! रोज वर्धा जिल्हात 250 एसटी बसेसची तपासणी.

प्रवाशांनो सावधान! रोज वर्धा जिल्हात 250 एसटी बसेसची तपासणी.

प्रवाशांनो सावधान! रोज वर्धा जिल्हात 250 एसटी बसेसची तपासणी.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा,दि.5 ऑक्टोबर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच राज्य परिवहन महामंडळा कडून प्रवासी बससेवा सुरू करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तींंमुळे रापमला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. याच फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वर्ध्याच्या रापम विभागाने कंबर कसली असून, तब्बल दहा पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून दररोज किमान २५० बसेसची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाययोेजनांचे पालन करून प्रवाशांची ने-आण सध्या रापम करीत असले तरी, फुकट्या प्रवाशांमुळे मोठा तोटा या विभागाला सोसावा लागतो. हाच तोटा टाळता यावा तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागस्तरावर पाच, तर आगारस्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत. ही दहा पथके प्रत्येक दिवशी किमान २५० बसेसची तपासणी करून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत.

तीन दिवसात १ हजार बसेसची तपासणी
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत. एका दिवशी किमान २५० बसेसची तपासणी ही पथके करीत आहेत. प्रवाशांनीही बसमध्ये चढताच तिकीट घ्यावे, तसेच प्रवास संपेपर्यंत त्यांच्याजवळील तिकिटाचे जतन करावे.- विजय धायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, रा.प.म. वर्धा.