वनोजा येथील निस्वार्थपणे वन्यजीवांची,मुक्या जीवांची सेवा करणारा अवलिया..
दिवसरात्र निस्वार्थपणे वन्यजीव रक्षणासाठी झटणारा, महाविद्यालयाचे प्राध्यापकांचे उचित मार्गदर्शन व अप्रतिम सहकार्य…
विनायक सुर्वे वाशिम प्रतिनिधी
वाशीम:- जिल्ह्यातील वनोजा येथील श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात शिकणारा वनोजा येथील अवघ्या २० वर्षाचा आदित्य वनोजा गावात पर्यावरण अभ्यासक गौरव कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली १० युवकांना सोबत घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी झटत आहे. वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजा या नावाने अशासकीय संस्था चालवून मुक्या जीवांचा जीव वाचवतो आहे. ह्या विद्यार्थ्यांने आज कौतुकास्पद अशी कामगीरी केली.७ फुट लांब अतिशय दुर्मिळ झालेल्या अजगराला पर्यावरण अभ्यासक गौरव कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या सहकारी सर्पमित्रांसोबत मिळुन सुरक्षित रित्या रेस्क्यू करून जीवदान दिले. २ वर्षामध्ये हजारो हुन अधिक साप शेकडो हुन अधिक वन्यजीवांचा जीव वाचवणारा हा अवलिया च म्हणाव. 2 महिण्यात अति दुर्मिळ अश्या ३ मांडुळ सापाला, एकाच दिवशी १० विषारी नागाला जीवदान दिले, वन्यजीवांच्या शिकारीचे डाव उधळुन लावले हजारो वन्यजीवांना वाचविले, या बरोबरच मानव वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी व रखरखत्या उन्हात वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व विशेष म्हणजे लोकवर्गणी व लोकसहभागातून वनोजा येथील प्रादेशिक जंगलामध्ये ३ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती आपल्या सहकारी मित्रासोबत केली.एवढ्यावरच न थांबता त्या पाणवठ्यांमध्ये उन्हाळ्यात स्वखर्चाने तसेच वनविभागाच्या सहकार्याने वेळोवेळी पाणी टाकुन दररोज शेकडो वन्यजीवांची तहान भागविण्याचे कार्य तो करतो.रस्ता अपघात किंवा इतर कारणाने जखमी झालेल्या वन्यजीवांवर वनविभागाच्या सहकार्याने योग्य तो उपचार करून त्यांना त्यांच्या अधिवासात मुक्त करून जीवदान देतो. वेळोवेळी सर्प रक्षक गौरव कुमार इंगळे व सुबोध साठे यांच्या जनजागृती पर कार्यक्रमांचे महाविद्यालयांमध्ये आयोजन करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सापांबाबत असलेली अंधश्रद्धा व गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या याच कार्यामुळे दुर्मिळ होत असलेल्या सापांच्या प्रजातींचे रक्षण व संवर्धन होण्यासाठी मदत मिळत आहे.एवढेच च नव्हे तर रक्तदान, गोरगरिब बेसहारा लोकांना मदत करणे, वृध्दाश्रमातील वृध्दांसाठी वेगवेगळे सामाजिक कार्य तो करतो.कोरोना च्या कठीण काळात सुध्दा स्वतः च्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे वन्यजीवांच्या सेवेसाठी तो झटत होता.हे कार्य तो निस्वार्थपणे करतो. पर्यावरण अभ्यासक गौरव कुमार इंगळे यांचे अमुल्य असे मार्गदर्शन, आईवडिलांचे योग्य असे सहकार्य, महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन व उचित असे सहकार्य व या बरोबर आपल्या मित्रांच्या खंबीर साथ यामुळेच फक्त वाशिम जिल्ह्यात च नव्हे तर पुर्ण महाराष्ट्र भर तो आपल्या नावाची वेगळी अशी छाप टाकत आहे.आदित्य वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे हि आमच्या साठी आमच्या वनोजा गाव साठी व महाविद्यालया साठी खरच अभिमानास्पद बाब आहे. तसेच इतरांसाठी हे प्रेरणादायी कार्य आहे.