ऑनलाईन शिक्षणासाठी, “मोबाईल” देऊन केली मदत…!

56

ऑनलाईन शिक्षणासाठी, “मोबाईल” देऊन केली मदत…!


समाजातील प्रत्येक व्यक्तीला जाणिव असते . समाज्याचे आपल्यावर ऋणानुबंधने खूप काही असतात ,ते ऋण समाजासाठी देण्यासाठी आपण कटिबद्ध असतो.ही सेवा समाजाला देण्यासाठी जीवनामध्ये काहींना -काही करण्याची अहोरात्र समाजसेवा करावी असे वाटते. पण हे बोलून चालणार नाही ,आणि शक्यही नाही आपल्या डोळ्यासमोर ध्येय, उद्दिष्टे, चिकाटी, जिद्द ,सहानुभूती व चांगुलपणा असावा.आपण स्वतःला लोक सेवेसाठी अर्पण होण्यासाठी समाजात उत्तम चांगले व्यक्तीमत्त्व निर्माण करावे लागते. आपले व्यक्तीमत्त्व इतरांसाठी काही करण्याची इच्छा शक्ती व इतरांना देण्यासाठी मानसिक इच्छा असायला हवी लागते . आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपला वेळ आणि आपल्याकडील गरज नसलेल्या कोणत्याही वस्तू ( पुस्तके, कपडे, वह्या, जुना मोबाईल, आर्थिक मदत,इत्यादी) इतर गरीब गरजू विद्यार्थ्यांना गरजू लोकांना भेट स्वरूपात दान दिले पाहिजे त्यामुळे आपल्याबरोबर त्यांच्याही गरजा कमी होऊ शकतात आणि त्याचा विकास होऊ शकतो.
कोविड-१९ कोरोनाच्या प्रादुर्भावात जगभरात हादरून टाकलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सामान्य लोकांना आर्थिक नुकसान सन करावे लागले. या परिस्थितीत भारताने केलेल्या लॉकडाऊन मुळे भारतातील अनेक कुटुंब गरीब वस्त्या मध्ये काम करणाऱ्या लोकांचे पोट-पाण्याचे नुकसान झाले.कोरोना संसर्ग महामारीमुळे शाळा, कॉलेज तसेच महाविद्यालय बंद असल्याने सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु गरीब वस्त्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्याना झुंज द्यावी लागत आहे.
अधोरेखित संस्था “माझे भविष्य माझा आत्मसन्मान” अंतर्गत चालणाऱ्या प्रकल्प मधील धनश्री जगताप ही मुलगी १२वी मध्ये शिकत आहे. भांडूप ईस्टला फुटपाथवर वस्ती येथे राहून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात राहते. शिकण्याची जिद्द आहे आणि मोबाईल सध्या काळाची गरज झाली आहे. त्यासाठी संस्थेचे संस्थापक मा.शरद बाराथे सर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ती सुप्रियाताई मोहिते उपाध्यक्ष महाराष्ट्र (भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ ) यांनी सदर आपला जुना मोबाईल फोन अधोरेखित संस्थेतर्फे या विद्यार्थ्यांनील ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी धनश्री जगताप या गरीब गरजू मुलीला शिक्षणासाठी वापरण्यासाठी दिला. मोबाईल फोन सध्या काळाची गरज झाली आहे, आणि सध्या सर्वाचे शिक्षण हे ऑनलाईन मोबाईल वरती अत्यावश्यक झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ती सुप्रियाताई मोहिते उपाध्यक्ष महाराष्ट्र ( भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ महाराष्ट्र ) यांनी सदर आपला जुना मोबाईल फोन ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी धनश्री जगताप या गरीब मुलीला भेट म्हणून दिला.म्हणून अधोरेखित संस्था कडून सुप्रिया ताई मोहिते यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त केले.
सुप्रियाताई मोहिते” याने आपल्या मीडिया वार्ता न्यूज प्रतिनिधीसी सांगितले की माझी अपेक्षा आहे की समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी तुमच्याकडे घरी पडून असलेले साहित्य त्याचा वापर होत नसेल तर मोबाईल फोन अभ्यासाची पुस्तके इत्यादी.एखाद्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना दया. त्यामुळे अश्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न दूर होईल.
किंवा अधोरेखित संस्थेला मदत या स्वरूपात देऊन सहकार्य करू शकता.
तसेच सुप्रियाताई मोहिते म्हणाल्या, की भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ महाराष्ट्र संपूर्ण टीम शैक्षणिक वेगवेगळ्या उपक्रम विषयी काम करत आहे.सद्या ऑनलाईन शैक्षणिक संदर्भात महत्वाचा विषय : १) ऑनलाईन शिक्षण गृहीत न धरता प्रत्यक्ष रित्या जेव्हा शाळा चालू होतील तेव्हा जो अभ्यास शिकवला जाईल त्यावर आधारित परीक्षा घ्यावी असे शालेय शिक्षणमंत्री याना निवेदन देण्यात आले. २) अनुदानिक आणि विनाअनुदानिक शाळा ,कॉलेज, महाविद्यालय यांस कोविड-१९ सहाय्यता निधी मिळण्याबाबत , आम्ही शासनाला पत्रव्यवहार ( मा.मुख्यमंत्री ,मा.शिक्षण मंत्री,मा. राज्यपाल मंत्री ) यांना केला आहे. जर शासनाने कोविड-१९ सहाय्यता निधी उपलब्ध केल्यास सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालय आणि पालकांना निश्चित मोठा दिलासा नक्कीच मिळेल.
मीडिया वार्ता न्यूज कडून सुप्रियाताई मोहिते ( उपाध्यक्ष महाराष्ट्र) भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ महाराष्ट्र ,यांचे खूप खूप धन्यवाद….
                            – गुणवंत कांबळे प्रतिनिधी                                    दि. ०३/११/२०२०