श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगामाचा शुभारंभ.
गोपीनाथ मोरे प्रतिनिधी
जालना:- श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना लि, रावसाहेब नगर सिपोरा बाजार, तालुका भोकरदन येथे आज 18 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते व भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला, याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.