*वर्धा नदीकाठी पुराने बुडणाऱ्या परिसरातून राजुरा शहरा बाहेरून जाणारा बायपास मार्ग उड्डाणपूलाने जोडावा:- माजी आमदार सुदर्शन निमकर*
*माती टाकून भरल्यास कृत्रिम पुराचा धोका*
*तहसीलदारामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरिंना निवेदन*

*माती टाकून भरल्यास कृत्रिम पुराचा धोका*
*तहसीलदारामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरिंना निवेदन*
खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427
राष्ट्रीय महामार्ग क्र. 930(डी) हा महामार्ग राजुरा शहराच्या बाहेरून जाणार असून तो वर्धा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या परिसरातून जाणार आहे.
हा महामार्ग ग्राउंड लेवलच्या खूप उंचीवर नियोजित असून त्या उंचीसाठी मातिचा भराव टाकून बांधकाम होणार आहे.
सदर परिसर काळ्या मातीचा असून वर्धा नदीच्या पुरामुळे परिसरात निर्माण होणारया पुरस्थितीमुळे येणारे पाणी या महामार्गमुळे शहराच्या दिशेने जाईल आणि परिणामता कुत्रीम पुरस्थिती निर्माण होईल.
याच विषयावर माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी त्या परिसरात पर्यायी उड्डाणंपूलाने हा महामार्ग जोडावा जेणेकरून ही समस्या उद्भवणार नाही अशे निवेदन तहसीलदारा मार्फत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाला दिले आहे.
या विषयावर विचार न झाल्यास नियोजित महामार्गला परिसरातील नागरिकांसह आम्ही विरोध करून आंदोलन करून विरोध करू असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी संजय पावडे,राजू भाऊ डोहे,सचिन खोके, भीमराव कोरडे,गजानन खोके संदेश पडगेलवार,बापू खोके, उमेश ठक,राजकुमार भोगा सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.