मुंबई-गोवा महामार्गावर सरकार अजुन किती रक्ताचे सडे आणी मृत्युचा तांडव पाहणार? कोलाड नाका येथे ९ नव्हेंबर ला मानवी साखळी आंदोलन!

58

मुंबई-गोवा महामार्गावर सरकार अजुन किती रक्ताचे सडे आणी मृत्युचा तांडव पाहणार?
कोलाड नाका येथे ९ नव्हेंबर ला मानवी साखळी आंदोलन!

मुंबई-गोवा महामार्गावर सरकार अजुन किती रक्ताचे सडे आणी मृत्युचा तांडव पाहणार? कोलाड नाका येथे ९ नव्हेंबर ला मानवी साखळी आंदोलन!

शहानवाज युनुस मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:05/11/2022

रोहा: मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य सरकार आजुन किती रक्ताचे सडे आणी मृत्यूचा तांडव पाहणार?
१२वर्षे झाली ना चौपदरीकरण झाले,
मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा मृत्यूचा सापळा बनला.
अनेकांचा रस्त्याने बळी घेतला तर शेकरो प्रवासी अपघातात जखमी झालेत,
सरकार मध्ये असले की दुर्लक्ष करतात,सत्तेबाहेर आले की बोंबा मारतात, रखडलेला मुंबई गोवा हायवे हा सर्वच राजकीय पक्षाचा पाप!
निर्दयी सरकार आणी निर्दयी विरोधीपक्षा च्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला आसल्याने महामार्गा च्या चौपदरीकरणास झालेला विलंब आणी या मार्गाचे झालेल्या दुरावस्थे च्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व किरण नाईक यांच्या मार्गदर्शना खाली रायगड जिल्हा प्रेस क्लब तर्फे ९नव्हेंबर ला कोलाड नाक्या च्या रस्त्यावरील प्रवासी वाहतूकिला कोणताही अडथळा निर्माण न करता मानवी साखळी आंदोलन करण्याचा निश्चय केला आहे.
बुधवार दि:०९/११/२०२२,ला सकाळी १०:३० वाजता कोलाड नाका येथे अम्ही येतोय….
तुम्ही ही या कारण या महामार्गावर अपघाती बळी गेलेले आणी गंभीर जखमी झालेले शेकडोजन आपलेच कोणीतरी आहेत.