न्यु ईंग्लिश स्कुल नेवरुळ यांच्या वतीने प्रसिद्ध समाजसेवक कृष्णा महाडिक यांचा सत्कार
🖊️नंदकुमार चांदोरकर🖊️
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगांव : – २ जुन २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण म्हसळा तालुका उध्वस्त झाला होता. त्यातच म्हसळा तालुक्यातील न्यु ईंग्लिश स्कूल, नेवरुळ या शाळेचे अत्यंत दयनीय अवस्था झाली होती, अशामुळे पुन्हा शाळा नव्याने उभी करण्यासाठी शाळेचे अध्यक्ष, शिक्षकवृंद व ग्रामस्थ यांच्या पुढे मोठे प्रश्न चिन्ह उभे राहिले. पण स्कूल अध्यक्ष रवींद्र लाड यांनी जिद्द सोडली नाही,या साठी समाजसेवक क्रुष्णा महाडिक यांनी एक हात मदतीचा दिला व शाळेला लागणारे सर्व साहित्य शाळेची रंगरंगोटी, फर्निचर, पत्रे,ईतर काही वस्तू महाडिक यांनी उपलब्ध करून दिले,आणि ही शाळा पुन्हा बोलकी होऊन पुन्हा नव्याने दिमाखात उभी राहिली, याच अनुशंगाने शाळेचे अध्यक्ष रवींद्र लाड व शिक्षकवृंद यांनी क्रुष्णा महाडिक यांच्या निवासस्थानी जाऊन शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन क्रुष्णा महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष रवींद्र लाड यांनी महाडिक यांचे आभार मानले कारण तुम्ही शाळेच्या दुरुस्तीसाठी मदतिचा हात दिला म्हणून ही शाळा बोलकी झाली असे लाड यांनी आपले मत व्यक्त केले,उपस्थित शाळेचे अध्यक्ष रवींद्र लाड,मुख्याध्यापक मिणेकरसर, कापसेसर, संदिप कार्लेकर, शांताराम घोले,मोहन किलजे,दत्ताराम महाडिक, दत्तात्रय लटके, सुशांत लाड,संतोष उध्दरकर, राजेंद्र लाड, सुजित काते, संतोष घडशी,किशोर गुलगुले,उपस्थित होते.