7890 भावी शिक्षक देणार शिक्षक पात्रता परीक्षा
• 10 नोव्हेंबरला होणार चाचणी
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 5 नोव्हेंबर
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात ही परीक्षा एकूण 17 केंद्रांवर दोन सत्रांमध्ये होणार आहे. जिल्ह्यात एकूण 7 हजार 890 उमेदवार अर्थात भावी शिक्षक ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये दोन हजार 994 विद्यार्थी पहिला पेपर, तर चार हजार 896 भावी शिक्षक दुसरा पेपर देणार आहेत.
डी.एड., बी.एड.चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना शिक्षक बनण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. टीईट उत्तीर्ण उमेदवारच सीईटी परीक्षा देऊ शकतात. सीईटमध्ये मेरीट लिस्टनुसार शिक्षकपदी नियुक्ती होत असते. त्यामुळे टीईटी परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षकांची जागा भरण्यात आल्याने यंदा डी.एड., बी.एड. पात्रताधारकांच्या इच्छा उंचावल्या आहेत. त्यामुळे यंदा तब्बल 7 हजार 890 उमेदवारांनी अर्ज केला आहे. यामध्ये दोन हजार 994 विद्यार्थी पहिला पेपर, तर चार हजार 896 विद्यार्थी दुसरा पेपर देणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे.
दोन पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध केले असून, परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी पुरावा म्हणून मूळ ओळखपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखीचा पुरावा अनिवार्य आहे. दोन पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र असणे आवश्यक आहे. दोन पेपरसाठी बैठक क्रमांक वेगळा असणार आहे. त्यामुळे स्वतंत्र प्रवेशपत्र आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. 20 मिनिटे आधी प्रवेश देण्यात येईल. ही परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात घेण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-1 करिता दोन हजार 994 विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यांची परीक्षेची वेळ रविवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-2 चार हजार 896 विद्यार्थी देणार असून, त्यांची परीक्षेची वेळ रविवारी दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत आहे.
कसून तपासणी होणार : सोनवाणे
10 नोव्हेंबरला होणार शिक्षक पात्रता परीक्षा, 17 केंद्रांवर होणार असून, 7 हजार 890 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत प्रत्येक परीक्षा दालनात, केंद्राच्या प्रवेशद्वारावर, केंद्र नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे कुणीही गैरप्रकार करण्याचा प्रकार करू नये. गैरप्रकार करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अश्विनी सोनवाणे यांनी दिली.