अलिबाग काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीने महाविकास आघाडीच्या शेकाप पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी अलिबाग येथे ही घोषणा केली.
यावेळी भास्कर चव्हाण, अध्यक्ष, अलिबाग तालुका काँग्रेस कमिटी, ॲड.प्रवीण मधुकर ठाकूर, सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सुनील थळे, उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, ॲड. प्रफुल्ल पाटील, विभागीय अध्यक्ष, शहापुर काँग्रेस कमिटी, अलिबाग शहर अध्यक्ष समीर उर्फ हुनी ठाकूर, प्रभाकर राणे, मुळे उपसरंच प्रसाद थळे, जगदीश कवळे, सुदेश समेळ,भास्कर भोपी व जयेंद्रथ पाटील इ. उपस्थित होते.