भिवंडी निजामपूर शहर महापालिकेचे ८ कर्मचारी सेवानिवृत्त, उपायुक्तांच्या हस्ते केला सत्कार
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
मो: 9960096076
भिवंडी : भिवंडी शहर महानगर पालिकेच्या सेवेत काम करणारे आठ कर्मचारी नियमानुसार नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाले आहेत त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून काल सायंकाळी पालिका सभागृहात उपाआयुक्तांच्या हस्ते त्यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला. यावेळी पालिका कर्मचारी व त्यांच्या परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१) प्रकाश गोपाळ काठवले, २) जगदिश जयराम तरे, ३) शंकर कृष्णा लोहार ४) प्रकाश चंद्रय्या कदम ५) काळुबाई दुंधाराम धनगर ६) श्रीकांत विनायक वनगे, ७) गणेश मगन चौधरी, ८) सुधिर काशिनाथ मोरे असे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नांवे आहेत. महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगर पालिकेचे उपाआयुक्त शैलेश दोंदे यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियन अध्यक्ष भानुदास भसाळे, सचिव श्रीपत तांबे यांच्यासह विविध युनियनचे पदाधिकारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा परिवार, पालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









