यारी दोस्ती ग्रुप सदस्य संदीप पाटारा यांना मनःपूर्वक सलाम!

79

रक्तदानाचा खरा योद्धा — यारी दोस्ती ग्रुप सदस्य संदीप पाटारा यांना मनःपूर्वक सलाम!

विक्रमगड प्रतिनिधी

भारत पाटारा

मो: 8779829335

आपल्या समाजात अनेक लोक आपले आयुष्य आपल्या कुटुंबापुरते मर्यादित ठेवतात, पण काही व्यक्ती अशा असतात ज्या समाजासाठी, माणुसकीसाठी, आणि दुसऱ्यांच्या जीव वाचवण्यासाठी जगतात. अशाच निस्वार्थ भावनेने प्रेरित व्यक्तिमत्व म्हणजेच — यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य श्री. संदीप पाटारा (खुडेद -विक्रमगड)

संदीप पाटारा यांनी आतापर्यंत तब्बल 21 वेळा रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांचे जीव वाचवले आहेत. प्रत्येक वेळेस त्यांनी केवळ आपली जबाबदारी म्हणून नाही, तर मानवतेचा धर्म म्हणून रक्तदान केले आहे. आजही कुठे “रक्ताची गरज आहे” असा एकच संदेश ग्रुपवर आला, तरी संदीप क्षणाचाही विलंब न लावता “मी तयार आहे!” असं उत्तर देतात.

त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यातून समाजासमोर खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आदर्श उभा राहिला आहे. 21 वेळा रक्तदान करणं म्हणजे केवळ आकडा नाही, तर त्या मागे असते 21 वेळा कोणाचं तरी आयुष्य वाचवण्याची आनंददायी भावना, 21 कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं समाधान आणि 21 वेळा माणुसकीचं तेज उजळवण्याचा संकल्प!

यारी दोस्ती ग्रुपमध्ये संदीप पाटारा हे केवळ सदस्य नाहीत, तर रक्तदात्यांच्या प्रेरणेचा दीपस्तंभ आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुणांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचं प्रत्येक पाऊल सांगतं —

आपण दिलेलं रक्त एखाद्याचा श्वास बनू शकतं; म्हणून रक्तदान करा, जीवनदान द्या!

यारी दोस्ती ग्रुप, पालघर त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल मनःपूर्वक गौरव व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला सलाम करतो. अशाच समाजाभिमुख, नि:स्वार्थ वृत्तीच्या माणसांमुळेच आज आपला समाज अजूनही माणुसकीवर जगतो