डॉ. संपदा मुंडे प्रकरणात कायद्याचे रक्षकच भक्षक…

46

न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न – डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड

केज/ प्रतिनिधी: डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसून येतेय. ज्यांचावर अन्याय, अत्याचार झाला त्यांनी न्याय कोणाकडे मागावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, अशा जबाबदार कायद्याचे रक्षकच डॉ. संपदा मुंडेचे भक्षक झाल्याचे दिसून येते मग न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न जनतेला पडला आहे.

असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेव ( बप्पा) गायकवाड यांनी व्यक्त केले. आताच्या घडीला डॉ. संपदा मुंडे यांच्यावर जो अन्याय – अत्याचार झालेला आहे तो कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावणारा आहे. अशाप्रकारचा अन्याय अन अत्याचार पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभनारा आहे.

राज्य शासनाने, गृहखात्याने अशा घटना घडू नयेत यासाठी कठोरात कठोर पावले उचलली पाहिजेत. डॉ. संपदा मुंडे यांना मरणोत्तर तरी गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा करून न्याय द्यावा अशी मागणी डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी केली आहे.