नागपूर येथे झालेल्या Tribal Fashion Show मध्ये पालघमधील आदिवासी YouTube कलाकारांचा दबदबा 

92

नागपूर येथे झालेल्या Tribal Fashion Show मध्ये पालघमधील आदिवासी YouTube कलाकारांचा दबदबा

विक्रमगड प्रतिनिधी

भारत पाटारा

मो: 8779829335

नागपूर: या ठिकाणी Tribal फॅशन शो दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित केला होता, या ठिकाणी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बस्तर, तसेच पूर्ण भारतातून 45 पेक्षा जास्त आदिवासी जमातीच्या लोकांनी आपली संस्कृती सादर केली सहभाग नोंदवला होता. आणि आपल्या पालघरची आदिवासी संस्कृती सादर करण्यासाठी पालघरचे आदिवासी YouYube कलाकार रवि सातपुते, किरण वरठा, पायल वरठे, लक्ष्मी सातवी आणि social Media Influencer म्हणून नितीन दिवा, आणि आकाश दांडेकर असे कलाकार गेले होते, मात्र या कलाकारांनी आपल्या पालघरची संस्कृती आणि आपला तारपा याचे योग्य सादरीकरण केले आणि सिद्ध करून दाखवले.

या शो मध्ये आपल्या पालघरचे श्री रवी सातपुते सर यांचा प्रथम क्रमांक आला आणि त्यांना आणि त्यांना Mr. Nagpur या नावाने गौरविण्यात आले,त्याच बरोबर या शो मध्ये आपल्या पालघरचे दुसरे कलाकार श्री किरण वरठा याचा 3 रा क्रमांक आला आणि या शो चे ते Second Runner up*म्हणून गौरविण्यात आले. या सर्वांनी आपल्या पालघर जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे.