शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर

102

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात होणार संविधान सन्मान सभा

अरुणकुमार करंदीकर

पनवेल शहर प्रतिनिधी

मो: 7715918136

 पनवेल : मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा भरवली जाणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या महासभेच्यावेळी शिवाजी पार्क तुडुंब भरले होते. लाखो लोकांनी संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एकदिलाने हाक दिली होती.

त्या ऐतिहासिक गर्दीच्या साक्षीने उभा राहिलेला शिवाजी पार्क यंदा पुन्हा सज्ज होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही महासभा यंदा आणखी भव्य, प्रभावी आणि ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

या सभेत संविधानाच्या रक्षणाचा निर्धार, मनुवादाविरोधातील भूमिका आणि लोकशाही मूल्यांचे पुनरुज्जीवन याची चर्चा केली जाणार आहे. संविधान सन्मान सभेसाठी देशभरातून लाखो कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार आहेत.