महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधीकारी संघटने तर्फे रुग्नमित्र गजुभाऊ कुबडे यांचा सत्कार

✒प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक (मिवान्यु)
📲9766445348📲
वर्धा,दि.4 डिसेंबर:- महाराष्ट्र राज्य दिव्यांग/कर्मचारी अधिकारी संघटने तर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष संजय वाढवे यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय दिव्यांग सक्षमीकरण जनजागृती व कृती कार्यक्रम कार्यशाळा सप्ताह जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात रुग्णमितत्र श्री. गजूभाऊ कुबडे यांच्या 22 वर्षापासून अवीरत सुरु असलेल्या निस्वार्थ रुग्णसेवेच्या कार्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेस श्री.गजूभाऊ कुबडे यांनी रुग्ण सेवा या विषयावर आपले मत व्यक्त केले आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीमती येरावार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष संजयजी वाढवे वर्धा लोकसभेचे खासदार रामदास तडस, वर्धेचे आमदार पंकजजी भोयर, सुदेश येल्ले, संतोषी प्रशांत पहाडे, सुनील नंनोरे प्रवीण हांडे, विनोद हरणे, शमशेरजी, जया परमार, प्रकाश शिंगोटे, प्रहार जनशक्ती पक्षाचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष जगदीश तेलहांडे, अमित गोजे, सुरज कुबडे, सतीश गलांडे, अंकित नांदुरकर तसेच इतर दिव्यांग कर्मचारी अधिकारी बांधव आणि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.