हिंगणघाट तालुक्यात 14 वर्षीय तरुणीचा विहिरीत आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या?

48

हिंगणघाट तालुक्यात 14 वर्षीय तरुणीचा विहिरीत आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या?

● काचनगाव येथील तरुणी दोन दिवसांपासून होती बेपत्ता.
● वडनेर पोलिस करत आहे तपास

हिंगणघाट तालुक्यात 14 वर्षीय तरुणीचा विहिरीत आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या?
हिंगणघाट तालुक्यात 14 वर्षीय तरुणीचा विहिरीत आढळला मृतदेह; 

✒ मुकेश चौधरी ✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 7507130263📲
हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या काचनगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन दिवसा पासुन बेपत्ता असलेल्या एका 14 वर्षिय अल्पवयीन मुलिचा मृतदेह विहिरीत आढळल्याने गावात एकच खळबळ माजली आहे.भुमीका दशरथ महाजन असे मृतक मुलीचे नाव आहे.

मृतक भुमीका ही 1 डिसेंबर ला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती त्यानंतर ती आपल्या आई बरोबर पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. त्यांनतर ती काही न सांगता ती शेतातून निघुन गेली त्यानंतर ती घरी आली नव्हती. नतेवाईकानी सर्वत्र शोध घेतला होता पण तीचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयानी वडनेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मिसिंग तक्रार दाखले केली.

शुक्रवारी 3 डिसेंबरला गावातील विहिरीत भुमीकाचा मृतदेह आढळुन आला. घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलीस आपल्या ताप्या बरोबर घटनास्थळी आली. मृतदेह बाहेर काढून पंचनामा करुन उर्वरित तपासनीसाठी मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला.

भुमीकाची हत्या झाली की आत्महत्या केली हे पोस्टमार्डम रिपोर्ट आल्या नंतर कळेल. राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बागडे पोलिस कर्मचारी उमेश ठोंबरे , मनोज धात्रक, लक्ष्मण केंद्रे हे पुढील तपास करत आहे.