नागपुर मध्ये मोठ्या प्रमाणात रेशनच्या धान्याची काळाबाजारी, 175 पोते धान्य पोलिसांनी केले जप्त.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442 📲
नागपूर:- नागपुर जिल्हात शासनाकडुन देण्यात येणा-या राशन कार्डवरील धान्याची मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. गरिबाचे राशन काळाबाजारात जात असल्यामूळे अनेक परिवाराला आपल्या हक्काचे राशनला मुखाव लागत आहे. अशीच एक घटना नागपुर येथील शांतीनगर पोलिसांनी उघकिस आनली आहे.
नागपूर येथील शांतीनगर पोलिसांनी राशनच्या धान्याची काळाबाजारी करणाऱ्यांवर तस्करांवर मोठी कारवाई करत कुख्यात आरोपीच्या घरातून 175 पोती धान्य जप्त केले. शांतीनगर पोलिसांनी कुख्यात वसीम चिराच्या घरी छापा टाकला. पोलिसांनी वसीमच्या घरातून 175 पोती जप्त केली. वसीम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तहसील, लकडगंज, शांतीनगर पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
नागपूरच्या शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास असणारा कुख्यात गुन्हेगार वसीम चिरा हा धान्याची काळाबाजारी करतो. त्याच्या घरी धान्याचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून धान्याची 175 पोती जप्त केली. गेल्या काही दिवसापासून शहरात धान्याचा मोठा काळाबाजार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरीच्या मदतीने त्याची माहिती मिळवली. त्यात वसीम चिराच्या घरातून हे सुरू असल्याची माहिती समोर आली. काळाबाजारी करणा-या तस्कराची वेसन टाकने अन्न पुरवठा अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे.