गावकऱ्यांनी चोरट्याला रंगेहात पकडले

48

गावकऱ्यांनी चोरट्याला रंगेहात पकडले

गावकऱ्यांनी चोरट्याला रंगेहात पकडले
गावकऱ्यांनी चोरट्याला रंगेहात पकडले

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
7620512045

लाखणी:-एकाच रात्री चार घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांपैकी एका चोरट्याला रंगेहात पकडण्यात गावकऱ्यांना यश आले. तर तीन जण पसार झाले.भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव येथे चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
चक्रवर्ती सुंदरवेल (४५) रा. कल्लुड (तामिळनाडू) असे गावकऱ्यांनी पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास चार चोरटे गावात शिरले. प्रारंभी गोवर्धन गहाणे यांच्या घराच्या मागील दार तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल
लंपास केला. त्यानंतर ईश्वर मळकाम यांच्याकडे चोरी करून २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच दोन इतर घरेही फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरी करीत असताना एका कुटुंबाला जाग आली. त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे चोरटे घटनास्थळावरून पळू जाऊ लागले. मात्र नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलाग केला, तेव्हा एक चोरटा गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. तिघे जण मात्र पसार झाले. गावकऱ्यांनी चोरट्याला चांगलाच चोप दिला.
या घटनेची माहिती होताच लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. चोरट्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.