यवतमाळ जिल्हात हत्येनंतर दोन गटांत राडा, जाळपोळ नंतर जमावबंदीचे आदेश लागु.

● काळीदौलत गावात तणावाची परिस्थिती कायम.
● गावामध्ये पोलिसांनी
जमावबंदीचे आदेश लावले.
✒यवतमाळ जील्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ:- जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काळीदौलत येथूनल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामूळे गावात तनावाची परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामूळे पोलिसांनी काळीदौलत गावात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.
काल दुपारच्या सुमारास काळीदौलत गावात श्याम राठोड वय 22 वर्ष या तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणाच्या हत्येनंतर त्याचा नातेवाईकांनी बसस्थानक परिसरात जाळपोळ करायला सुरवात केली. त्यामूळे गावातील दोन गटांत विवाद वाढला. विवाद वाढत असल्याचे बघता पोलिसांनी गावात मोठ्या प्रमाणात पोलीसबल तैनात केले आहे व जमावबंदीचे आदेश लावण्यात आला. गावात सध्या शांतता आहे. आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलेत.
काळीदौलतमध्ये रहाणारे श्याम राठोड हे लक्ष्मण राठोडसोबत दुचाकी मोटरसायकलने जात होता. बसस्थानक परिसरात दुचाकीचा एका युवकाला धक्का लागला. यावरून श्याम व त्याच्या भावाबरोबर वाद झाला. वादाचे पर्यवसान तलवारीने वार करेपर्यंत गेले. यात श्यामचा मृत्य झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली
आरोपी पसार झाल्यानंतर श्यामच्या नातेवाईकांनी सायंकाळी बसस्थानक परिसरात जाळपोळ केली. हत्याझाल्याची बातमी वार्या सारखी गावात पसरली. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेला जातीय रंग देण्यात आला. जुन्या वैमनस्यातून हा खून झाला असावा असा अंदाज आहे.