पालकमंत्री दिलेला शब्द पूर्ण करीत नाही, पालकमंत्र्याच्या कार्यप्रणालीवर अविश्वास ठेवत ग्रामपंचायतीचा “मुख्य दुआ दुरावला.

52

पालकमंत्री दिलेला शब्द पूर्ण करीत नाही, पालकमंत्र्याच्या कार्य प्रणालीवर अविश्वास ठेवत ग्रामपंचायतीचा “मुख्य दुआ दुरावला.

 

पालकमंत्री दिलेला शब्द पूर्ण करीत नाही…

राहुल भोयर ब्रम्हपुरी प्रतिनिधी

मो.9421815114

ब्रम्हपुरी:- काँग्रेस च्या सानिध्यात राहून गेली अनेक वर्षे पक्षात काम करून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील अकरा विद्यमान ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदावरील पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दिलेला शब्द पाळत नाही व तालुका काँग्रेस कमेटी आमचे कुठलेही काम करत नाही. हे आरोप करत ब्रह्मपुरी काँग्रेस तालुकाध्यक्ष यांचेकडे आपले प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले.विशेष म्हणजे राजीनाम्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तालुक्यातील काँग्रेसचे सर्वेसर्वा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांनी सरपंचांना त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये खनिज कर्म निधीमधून एकूण 25 – 25 लाखाची निधी देण्याचे त्यांना आश्वासन दिले होते.मात्र पालकमंत्र्यांनी त्यांचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. तसेच तालुका काँग्रेस कडून त्यांची कोणतेही काम होत नसल्याने आम्ही राजीनामा देत असल्याचे त्यामध्ये नमूद केलेले आहे.

कोरोना संकटकळात राज्याच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाली.परिणामी विकासकामांसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात जास्त कालावधी लागत आहे . शिवाय राजीनामा देणारे सरपंच हे चिमूर विधानसभा क्षेत्रातंर्गत असणाऱ्या गावातील असल्यामुळे या गावांना स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत ना . विजय वडेट्टीवार यांना विकासकामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसने म्हटले आहे व त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांनी दिलेले पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका काँग्रेस कमिटीने फेटाळले आहेत.

राजीनामा देणारे याप्रमाणे आहेत
1 ) संजय रामाजी राउत, सरपंच ग्रा.पं तोरगांव बुज .2 ) राकेश शंकर पिलारे, सरपंच ग्रा.पं कालेता. 3 ) शरद अशोक अलोने, सरपंच ग्रा.पं तोरगांव खुर्द. 4 ) सुधिर पिलारे, सरपंच ग्रा.पं बेलगांव जाणी. 5 ) प्रविण बांडे , सरपंच , ग्रा.पं . नांदगांव जाणी. 6 ) सुरेश दुनेदार, सरंपच ग्रा. पं. पिंपळगांव भो . 7 ) नंदकिशोर राखडे, उपसरंपच ग्रा . पं . खंडाळा ,8 ) राजु नान्हे , सरंपच ग्रा . पं . कहाली . 9 ) अर्चना डेंगे, सरपंच ग्रा.प. खंडाळा. 10 ) नरेशचंद्र राऊत, उपसरपंच कालेता. 11) प्रेमानंद मेश्राम, सरपंच सोनेगाव.