नागपुर कचरा फेकण्यावरून दोन महिलामध्ये फ्रिस्टाईल लढाई.

61

नागपुर कचरा फेकण्यावरून दोन महिलामध्ये फ्रिस्टाईल लढाई.

नागपुर कचरा फेकण्यावरून दोन महिलामध्ये फ्रिस्टाईल लढाई.
नागपुर कचरा फेकण्यावरून दोन महिलामध्ये फ्रिस्टाईल लढाई.

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442📲
नागपुर:- नागपुरच्या विनोबा भावे नगरात दोन महिलांमध्ये कचरा फेकण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामूळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाद करणा-या महिलाची नावे गीता बारापात्रे व नाझू कांबळे अशी आहेत.

माझ्या घरासमोर कचरा कशाला टाकला. तुला कचरापेटीत तुझा कचरा टाकता येत नाही का, अस विचारत असतांना वाद सुरु होता. हा वाद विकोपाला गेला त्यामुळे या दोन्ही महिला मध्ये तुंबड शब्दफेक झाली. एकमेकींना अश्लील शिविगाळ करण्यात आली. त्यानंतर दोघीही हमरी तुमरी वर येऊन मारहाण करण्यात आली. शेवटी यशोधरनगर पोलिसांत तक्रार पोहचली. दोघींनाही समज देऊन पोलिसांनी घरी पाठविले. त्यावर समाधान न झाल्यानं नाझू कांबळे या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.