जगभरात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो.जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव उत्सहात...

जगभरात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो.जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव उत्सहात…

जगभरात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो.जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव उत्सहात...

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-दिनांक 03 /12 /2024 रोजी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग रायगड अलिबाग व डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक् अक्षम मुलांची विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगाना प्रोत्साहन मिळावे व विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा याकरता दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते.

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पनवेल मधील बाठिया क्रीडांगणात मोठ्या उत्साहात पार पडल्या .या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील 16 विशेष शाळांनी सहभाग घेतला होता.या क्रीडा स्पर्धेत वयोगटानुसार धावणे, गोळा फेक ,सॉफ्टबॉल थ्रो ,उभे राहून लांब उडी, लांब उडी बादलीत बॉल टाकने, 25 मीटर चालणे या स्पर्धा बौद्धिकअक्षम ,कर्णबधिर ,बहुविकलांग या प्रवर्गामध्ये घेण्यात आल्या.या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यजित बडे साहेब यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. श्यामराव कदम साहेब ,सहाय्यक सल्लागार दिव्यांग कल्याण कक्ष रा.जि.प अलिबाग श्री. साईनाथ पवार साहेब, समाज कल्याण कार्यालयीन अधीक्षक सौ. अंजली मंत्री मॅडम, प्रशासन अधिकारी दिव्यांग शाखा रा.जि.प अलिबाग श्री. प्रशांत काळे साहेब, सहाय्यक लेखा अधिकारी समाज कल्याण विभाग रा.जि.प अलिबाग चे श्री.अमित शेवाळे, प्राचार्य के.आ.बाठिया विद्यालय तथा अध्यक्ष जिल्हा मुख्याध्यापक संघ श्री. बी.एस माळी सर, गटविकास अधीक्षक पंचायत समिती, पनवेल चे श्री. समीर वाटारकर साहेब, मुख्याध्यापक आगरी शिक्षण संस्था तथा म.रा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ चे श्री.पंकज भगत साहेब, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन चे डॉ.नंदकुमार मारुती जाधव साहेब, डॉ.नं. मा .जाधव् फाउंडेशनचे श्री. सुरेश जाधव साहेब, डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशनचे खजिनदार श्री. अतुल वाणी साहेब ,डॉ. नंदकुमार मारुती जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.श्रेया जाधव यांच्या व इतर मान्यवरांच्या तसेच सर्व शाळांचे ट्रस्टी व मुख्याध्यापिका यांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन मशाल प्रज्वलित करून करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत धावणे या स्पर्धेला झेंडा दाखवून क्रीडा महोत्सवात सुरुवात केली.

यानंतर दीप प्रज्वलन करून सर्व पाहुण्यांनी क्रीडा स्पर्धेच्या सोहळ्याचे उद्घाटन केले.उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ , सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन आयोजकांनी स्वागत केले.डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन चे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. नंदकुमार जाधव साहेब यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे स्वरूप, उद्देश सांगत या सोहळ्या मागची आयोजकांची भूमिका मांडली.

त्यानंतर अतिरिक्त मुख्य अधिकारी रा.जि.प चे श्री .सत्यजित बडे साहेब यांनी क्रीडा महोत्सवास शुभेच्छा देत डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशनच्या सुंदर आयोजनाचे कौतुक केले .जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर शामराव कदम साहेबांनी ही क्रीडा महोत्सवात शुभेच्छा दिल्या. सर्वांचे स्वागत करीत सुंदर आयोजनासाठी डॉ.नं.मा जाधव फाउंडेशनचे कौतुक केले. सहाय्यक सल्लागार दिव्यांग कल्याण कक्ष रा.जि.प अलिबागची चे श्री .साईनाथ पवार साहेब यांनी क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या .
त्यानंतर दिवसभर दिव्यांग प्रवर्गातील विविध वयोगटातील स्पर्धा मोठा उत्साहात पार पडल्या.दुपार सत्रात युनिटी स्मॉल फायनान्स बँक प्लॅनिंग अँड स्ट्रॅटर्जीच्या मॅनेजर विणा सदाफुले मॅडम व त्यांच्या सहकार्‍यांचे स्वागत करण्यात आले . बंठिया, महात्मा व केएलई विद्यालय च्या क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे क्रीडा स्पर्धाचे काम पाहिले .

स्पर्धेत विजयी विदयार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आहे. विजेत्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले .या कार्यक्रमात नाश्ता , सरबत, जेवण वैद्यकीय सेवा यांचे व्यवस्थित आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमात दिव्यांग विदयार्थ्यांची संपूर्ण काळजी घेण्यात आली.राष्ट्रगीताने क्रीडा महोत्सवाची सांगता झाल.समाजकल्याण विभाग रायगड व डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here