८ लाख 50 हजार युवक युवतींचा आपत्ती सुरक्षा प्रशिक्षणाचा शुभारंभ!

८ लाख 50 हजार युवक युवतींचा आपत्ती सुरक्षा प्रशिक्षणाचा शुभारंभ!

८ लाख 50 हजार युवक युवतींचा आपत्ती सुरक्षा प्रशिक्षणाचा शुभारंभ!

रायगडात कोणत्याही आपत्तीला मदत करण्यास युवक युवतींची फळी उभारणार डॉ. जयपाल पाटील

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील इयत्ता ८वी ते१५ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या ८ लाख 50 हजार विद्यार्थी यांना आपत्ती सुरक्षा युवक व युवती प्रशिक्षणाचा शुभारंभ नौदल दिनाच्या निमित्ताने टी. टी. पाटील हायस्कूल तीनविरा येथे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटील, मुख्याध्यापक अनंत गायकर, रिलायन्सचे निवृत्त फायर अधिकारी मोहन मिटांगरे, आरसीएफ थळचे मुख्य फायर अधिकारी सतीश निरगुडे,ह. भ. प. कुथे, वनबीट अधिकारी पाटील, पोयनाड पोलीस ठाण्याचे हवालदार म्हात्रे. ॲड. रत्नाकर पाटील,रमेश पाटील उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन मुख्याध्यापक अनंत गायकर यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मान केला यावेळी सर्वांकडून डॉ. जयपाल पाटील यांनी संविधान वाचन करून घेतले आपल्या गावात शाळेत कॉलेजला जाता येता अपघात, घर, कारखाने शेतात वाढीत आग लागली तर महिला मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर गावातील महिलांना बाळंतपणासाठी आरोग्य केंद्रात 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा,गावात व गावाशेजारील जंगलात आग लागली तर वन खात्याचा वापर कसा करावा याचे ज्ञान प्रत्येक मुला-मुलींना असलेच पाहिजे ज्यामुळे ते प्रशासनाला पुढे मदत करतील यासाठी रायगडचा युवक फाउंडेशन व रायगड जिल्हाधिकारी आपत्ती प्राधिकरणातर्फे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शाळा कॉलेजमध्ये जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय कॉलेजमध्ये हे प्रशिक्षण घेण्याची सुरुवात आज करीत असल्याचे सांगून अपघाताच्या वेळी 108 रुग्णवाहिकेचे प्रात्यक्षिक देताना डॉ. जयप्रकाश पांडे व पायलट पाटील, बाळंतपणासाठी 102 ला फोन कर लावताच पेंढाबे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सोहम यांनी चालक स्वप्निल पाटील यांना पाठविले. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी 112 क्रमांकाचा वापर करतात पोयनाड पोलीस ठाणे येथून गावात अगर गावात शेजारी आग लागतात मोठी आरसीएफ थळ येथे अश्विन जॉन यांनी आगीचा बंब आणि कर्मचारी यांना तातडीने पाठविले व त्यांनी येऊन आग विझवली गाव शेजारील जंगलात वनवे पेटले तर वन खात्याला या क्रमांकावर फोन लावताच वनखात्याचे कारलेखन बीट अंमलदार श्री पाटील आपली मशीन सहित टीम घेऊन उपस्थित झाले. मुलांना ही संबंधीची माहिती रिलायन्स निवृत्त फायर अधिकारी व आरसीएफचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. शेवटी गावात मृत्यू होतो तेव्हा तिरडीची आवश्यकता असते ती कशी बांधावी याचा प्रात्यक्षिक ह. भ. प. कुथे, खिडकी ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिले.कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेचे शिक्षक श्री.नलावडे सौ. भगत सौ. जुईकर श्री तांडेल सौ. अधिकारी श्री. आधार,कर्मचारी पाटील आपत्ती सुरक्षा मित्र विकास रणपिसे, महेंद्र खैरे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here