शिरूर अनंतपाळ पत्नी बाळंतपणाला गेल्यावर पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.
शिरूर अनंतपाळ:- पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर पुंडलीक नागीमे वय 32 वर्ष यांनी शिरुर अनंतपाळ येथे राहत्या घरी रात्री साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीसात आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल झाला आहे.
रामेश्वर पुंडलीक नागीमे हे गेल्या चार वर्षांपासून शिरूर अनंतपाळ पोलीस स्थानकात कार्यरत होते. ते भाड्याच्या घरात राहात होते. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेलेली असताना रात्रीच्या सुमारास त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम करीत आहेत.