प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

61
  • प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

 

     मिडिया वार्ता न्युज

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

     विशाल सुरवाडे

 

जळगाव-6 जानेवारी पत्रकारदिनाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डी. टी.आंबेगावे यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा अध्यक्ष सतीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

 पद्मालय शासकीय विश्ररामगृह जळगाव या टिकानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

 सभेचे अध्यक्ष ऍड अशोक शिंदे तसेच कार्यक्रमाला आलेल्या पदाधिकारी चे स्वागत सतिष सोनवणे जिल्हा अध्यक्ष यांनी केले.

 सूत्र संचालन .धम्म गणवीर जिल्हा संपर्क प्रमुख यांनी केले.

तसेच यावेळी उपस्थित पत्रकार संघाचे पदाधिकारी यांना मा. जळगांव जिल्हा अध्यक्ष सतीश सोनवणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

त्याच प्रमाणे अनाथांची माई शिंधूताई सपकाळ यांना श्रद्धांजली संघटने तर्फे देऊन समारोप करण्यात आला.

 यावेळी समाधान पाटील जिल्हा उप अध्यक्ष, विशाल सुरवाडे जळगाव तालुका अध्यक्ष,मुझमील शेख धरणगाव ग्रामीण अध्यक्ष, नारायण चव्हाण ,निलेश जवरे,राजेंद्र गणवीर,मयूर वाघूलदे,रवींद्र दाभाडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.