बॅकवॉटरमुळे नुकसान होत असलेल्या जमीन व पिकांची नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
✍मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045
लाखणी/भंडारा : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटर मुळे अधिग्रहीत न केलेल्या मात्र सध्या नुकसान होत असलेल्या जमीनीचे व पिकांचे नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकान्यांना दिले. यावेळी सार्वजनिक व वैयक्तीक मालमत्तांचे नुकसान होत असलेल्या बाबींना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. संदीप कदम बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) अर्चना यादवपोळ, अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता अ. वि. फरकडे, शशांक जनबंधु, तहसिलदार निलीमा रंगारी, कार्यकारी अभियंता य. दु. मानवटकर उपस्थित होते.
संचय क्षमता तपासणीसाठी १ नोव्हेंबरपासून पाणी पातळी
वाचविण्यात येत आहे. यामुळे बॅकवॉटरचे पाणी काही भागात शिरले आहे. भुसंपादन न झालेल्या मात्र बॅकवॉटर मुळे बाधित होत असलेल्या
शेतपिके व जमीनीचे नुकसान होत असलेल्या पिकांचा सर्वे महसूल यंत्रणेन्दारे करण्यात येईत. १० जानेवारीपर्यंत पुर्ण संचय पातळी करण्यात येईल. त्यानंतर ड्रोनदारे सर्वे करण्यात येईल.