राजुरा तालुका पत्रकार संघाचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा. 9 जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन

राजुरा तालुका पत्रकार संघाचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा.

9 जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन

राजुरा तालुका पत्रकार संघाचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा. 9 जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतिनीधी
8378848427

राजुरा : – राजुरा तालुका पत्रकार संघाचे वतीने दरवर्षी पत्रकार दिन कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमात पत्रकारिता सोबतच सामाजिक प्रबोधन कार्य करणाऱ्या पत्रकाराचा सत्कार केला जातो. यावर्षीही दिनांक 9 जानेवारी रोज रविवार ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीही स्वर्गीय महियार गुंडेविया स्मृती जेष्ठ पत्रकार पुरस्कार दैनिक भास्कर चे तालुका वार्ताहर एम. के. सेलोटे, स्वर्गीय प्रभाकर मामुलकर स्मृती उत्कृष्ठ वार्तांकन पुरस्कार पर्यावरण प्रेमी दैनिक तरुण भारत चे तालुका वार्ताहर बादल बेले , स्वर्गीय राघवेंद्र देशकर स्मृती ग्रामीण वार्ता पुरस्कार कोरपना येथील देशोन्नती चे तालुका वार्ताहर गणेश लोंढे , स्वर्गीय सुरेंद्र डोहे स्मृति पुरस्कार सकाळ चे वार्ताहर राहुल दुबे , स्वर्गीय शंकरराव देशमुख स्मृती इलेक्ट्रॉनिक्स मीडिया वार्तांकन पुरस्कार कृष्णकुमार पोचम कुमार यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात राजुरातील जेस्ट मनोवैज्ञानिक तथा समुदेशक डॉ सत्यपाल कातकर लिखित एज्युकेशनल फिलॉसॉफी ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होत आहे.
या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोखलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार असून आमदार सुभाष धोटे हे अध्यक्ष स्थानी आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार सुनील कुहीकर राहणार आहे. प्रमूख अतिथी म्हणून माजी आमदार ऍड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ऍड. संजय धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपाध्यक्ष सुनील देशपांडे, जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे , श्रीमती सुमनताई मामुलकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, तहसीलदार हरीश गाडे, न.प. चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव अविनाशजी जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप जैन , वकील संघाचे अध्यक्ष ऍड. निनाद येरणे जिल्हा पत्रकार संघाचे डॉ. उमाकांत धोटे हे उपस्थित राहणार आहे.
या पुरस्कार सोहळा कार्यक्रमास कोविड नियमावलीचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन राजुरा तालुका पत्रकार संघाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here