ग्रामसेवक तिवाडे यांचा मनमानी कारभार वरीष्ठाकरुन पाठराखण
किरमीरी येथील ग्रा प मधील घटना
वरीष्ठांकडे ग्रा प पदाधीकाऱ्यांची तक्रार
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-गावातील मूख्य कारभार बघणारी संसद म्हणजे ग्राम पंचायत असते आणि त्यातील महत्वाचा धूरा हा ग्रामसेवक असतो गावातील विकासकामात त्यांचा सिंहाचा वाटा असतो सरपंच.. उपसरपंच .. सदस्य यांच्याशी समतोल साधत ग्राम पंचायत चा कारभार चालवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो परंतु गोंडपिपरी तालुक्यातील किरमरी गावातील ग्रामसेवक तिवाडे या सर्व गोष्टीला अपवाद आहेत
उपसरपंच स्विटी मोहन डोंगरे यांच्या तक्रारीनुसार ग्रामसेवक तिवाडे यांचा अनुपस्थिमूळे आणि आत्तापर्यंत झालेल्या अल्पावधीतील तीन ग्रामसेवकांच्या बदलीमुळे किरमरी गावचा विकास खूंडला आहे
ग्रामसेवक ऊपसरपंचाला विश्वासात न घेता ठरावात न घेता ग्रामफंडातुन खर्च करतात जमाखर्च मासीक सभेत दाखवत नाही आठवड्यातून फक्त एक दिवस हजर रहातात सामान्य फंडात वीस ते तीस हजारांचा घोळ सूद्धा केला आहे सोबतच अजुनपर्यंत उपसरपंच तथा सदस्य यांचे मानधन मीटींग भत्ते काढले नाही याबाबत वरीष्ठाकडे तक्रार करुनही अजूनपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही
त्यामुळे कीरमरी गावाच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
अल्पावधीतच तीन.. तीन ग्रामसेवक बदलविण्यात आले असून तिवाडे ग्रामसेवक हजर रहात नाही तसेच ग्राम पंचायत पदाधिकारी यांना विश्वासात न घेता आपला मनमानी कारभार चालवीतो सामान्य फंडातून परस्पर रक्कम खर्च करतो त्यामुळे गावातील विकासाला अडथडा निर्माण होत आहे
स्विटी मोहन डोंगरे
उपसरपंच ग्रा प किरमीरी