दिक्षाभुमीच्या विकासा संदर्भात आ. जोरगेवार यांनी घेतली बैठक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या जाणुन घेतल्या सूचना
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर, 5 जानेवारी: आ. किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात चंद्रपूरच्या दिक्षाभुमीचा विकास करण्याची घोषणा केली आहे. त्यांनतर आ. जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी च्या पदाधिका-र्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-र्यांची बैठक घेत त्यांच्या सुचना जाणून घेतल्या.
चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी आ. जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. प्रत्येक अधिवेशात त्यांनी हा विषय उचलुन धरला. आता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलतांना मुख्यमंत्री यांनीही हा दिक्षाभुमीच्या विकासाची घोषणा केल्याने येथील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आ. जोरगेवार यांनी दिक्षाभुमी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या पदाधिका-र्यांची बैठक घेत येथील विकास कामांबाबत त्यांच्या सूचना जाणुन घेतल्या आहे.
यावेळी ध्यान केंद्र, भिक्कु निवास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सोलर प्लांट, प्रवेशद्वार, परिसर सौदर्यीकरण, संग्रहालय, लायब्ररी, एक हजार लोकांच्या क्षमतेचे सामाजिक सभागृह, लाईंट व्यवस्था, भोजनालय, भव्य बुध्द स्मारक यासह अनेक महत्वांच्या सोयी सुविधांबाबत चर्चा करण्यात आली आहे. याचा आराखडा या अगोदरच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांच्या आश्वासना नंतर लवकरच येथील कामाला सुरवात होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, उपकार्यकारी अभियंता संजोग मेंढे, डॉ. बाबासाहेब मेमोरिअल सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सहसचिव कुणाल घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश दहेगावकर, उप प्राचार्य संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.